यवतमाळ राजकीय

शिवसेना क्रीडा व सांस्कृतिक जिल्हाप्रमुख पदी विकास शेळके यांची निवड

शिवसेना क्रीडा व सांस्कृतिक जिल्हाप्रमुख पदी विकास शेळके यांची निवड

हिंदु ह्रदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात व नितीन बांगर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना क्रीडा व सांस्कृतिक यवतमाळ जिल्हाप्रमुखपदी विकास विनोदराव शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विकास शेळके हे

राळेगाव तालुक्यातील मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगाव येथील क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून कार्यरतआहे या नियुक्तीचे पत्र मा. खासदार भावनाताई गवळी यांनी एका छोटेखानी समारंभात विकास शेळके यांना प्रदान केले. जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नावलौकिक तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील खेळाडूंना जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा स्पर्धेमध्ये पोहोचवणारे विकास शेळके यांची नियुक्ती करण्यात आली ही खरोखर जिल्ह्यासाठी व शहरासाठी एक आनंदाची बाब आहे विविध क्रीडा संघटनांवर कार्य करणारे तसेच क्रीडाप्रेमी त्याचप्रमाणे गावातील शहरातील राजकारणामध्ये लोकांची कामे करून देणारे विकास शेळके हे सर्व हे सर्व दूर परिचित आहेत.

जिल्ह्यातील क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणखीन भरपूर प्रगती करण्याकरिता मी सोसायटीची सचोटीने प्रयत्न करीन असे वक्तव्य विकास शेळके यांनी यावेळी भावनाताई जवळ व्यक्त केले

शेळके यांच्या नियुक्ती बद्दल ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ संतोष कोकुरवार, मुख्याध्यापिका डॉशितल बल्लेवार शाळेतील शिक्षक व कर्मचारी, यवतमाळ जिल्हा शारीरिक शिक्षक व एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ अमोल देशमुख, सचिव किरण फुलझेले, अविनाश जोशी सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे प्रा अनंत पांडे निलेश भगत, शाहिद सय्यद प्रकाश उदासी गिरीराज गुप्ता शहरातील क्रीडाप्रेमींनी कौतुक केले आहे

Copyright ©