यवतमाळ राजकीय

यवतमाळ मध्ये उद्या शिवगर्जना माजी खासदार चद्रकांत खैरे करणार मार्गदर्श

यवतमाळ मध्ये उद्या शिवगर्जना माजी खासदार चद्रकांत खैरे करणार मार्गदर्शन

यवतमाळ–शिवगर्जना अभियाना अंतर्गत संपूर्ण राज्यात शिवगर्जना अभियाना घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने यवतमाळ येथे दि.१ मार्च 2023 ला उत्सव मंगल कार्यालय मध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .यावेळी विविध भागातील शिवसैनिकाना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा कडून करण्यात आले आहे.शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण हे बोधचिन्ह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिंदेगटाकडे बघण्याचा तरुणांचा दुष्टिकोन बदलला आहे . यवतमाळ शहरातील अनेक भागात जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील कार्यकर्ते पक्षाला मजबूत करण्या करिता जास्तीत जास्त तरुणांनी नव्या जोशाने उत्साहाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन कामाला लागले पाहिजे आणि शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मजबूत करण्याचे काम आता करायला हवे असे असे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आले आहे आगामी काळात ग्रामीण तसेच संघटनात्म कार्यासाठी शिवगर्जना अभियान शिवसैनिकांमध्ये ऊर्जा आणि जोश निर्माण करेल उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आमचे सच्चे मार्गदर्शक आणि सच्चे सैनिक आहेत आणि त्यामुळे यवतमाळचे नागरिक यांनी दि.१ मार्च ला दुपारी 3 वाजता,उत्सव मंगल कार्यालय,दत्त चौक,यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे शिवसेना नेते, प्रकाश मारावार शिवसेना सहसंपर्कप्रमुख नांदेड.शरद कोळी धडाडती तोफ दुर्गा शिंदे हर्षल काकडे (युवासेना कार्यकारिणी सदस्य.) प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमाला यशस्वी करण्या करिता विनोद पवार,यवतमाळ शहर अध्यक्ष यांनी भोसा,इंदिरा नगर,तारपुरा अनेक कार्यकर्त्यांची बेठक घेण्यात आल्या.संतोष ढवळे जिल्हाप्रमुख यवतमाळ. सर्व उपजिल्हा प्रमुख,तालुकाप्रमुख,शहरप्रमुख,महिला आघाडी,युवासेना,तथा समस्त पदाधिकारी तालुके-यवतमाळ,कळंब,बाभूळगाव,राळेगाव,घाटजी,इतर भागातून कार्यकर्त्यांना येण्याचे आवाहन केले आहे.

Copyright ©