यवतमाळ सामाजिक

सुसंस्कार विद्या मंदिर मध्ये विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

सुसंस्कार विद्या मंदिर मध्ये विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे विज्ञानाने आपल्या जीवनामध्ये खूप मोठी भर घातली आहे. आपले जीवन सुखी, सोपे आणि सोयीस्कर करून देण्यामागे विज्ञानाचा खूप महत्वाचा वाटा आहे . लहानात लहान गोष्टीचा विचार केला असता तेथे विज्ञान पाहायला मिळते पेना पासून ते लॅपटॉप पर्यंतच्या सर्व गोष्टी या विज्ञानाची देणगी आहे.

सुसंस्कार विद्या मंदिर येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधुन वर्ग १ते ९च्या विद्यार्थ्यांन करिता विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे सचिव के.संजय सर,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लो.बा.अणे शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ.छाया पांडे,गणित तज्ञ सौ.माधवी मोझरकर,विज्ञान तज्ञ सौ.ईशा देढे,स्टेटॅस्टीक असिस्टंट वैभव ठोंबरे सुसंस्कार विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे उपस्थित होत्या,सुरवातीला फित कापुन पाहुण्यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले, ह्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मुलांनी स्वत:बनववीले एकापेक्षा एक सरस असे विज्ञान प्रयोगाच्या प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधुन घेणाऱ्या होत्या,त्यामध्ये सोलर,सिस्टीम,रेनवॉटर हार्वेस्टिंग, जेसीबी,मळणी यंत्र,मंगलयान,सिक्युरिटी अलार्म,वॉटर सायकल, पर्यावरण व जग,थर्मल पॉवर प्लॉंट,ईत्यादी प्रतिकृती तयार करून आणल्या होत्या,

विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर शाळेचे व गावाचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे विज्ञान प्रदर्शनीचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या सौ.छाया पांडे ह्यांनी केले

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे म्हणाल्या भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. 21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे. नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते.

आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत की, आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे सुद्धा एक विज्ञानाच्या प्रगतीचे छान उदाहरणच आहे. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे योग्य वेळेत पूर्ण करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत असे त्या म्हणाल्या

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांना वरून बोलतानां सचिव के संजय म्हणाले

विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली,त्यानंतर वर्ग १ते ९ मधील प्रथम,द्वितीय,तृतीय आलेल्या प्रतीकृतींना विज्ञान प्रदर्शनी मध्ये पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,ह्या कार्यक्रमाचे संचालन अक्षता मारडवार तर आभार प्रदर्शन अंजली बेगडे ह्यांनी केले

ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच वर्ग आठवी व नववीच्या विद्यार्थांचे सहकार्य लाभले.

Copyright ©