Breaking News यवतमाळ

तिसऱ्या माळ्यावरून पडल्याने रुग्णाचा मृत्यू

यवतमाळ:-पुरुषोत्तम कामठे

तिसऱ्या माळ्यावरून पडल्याने रुग्णाचा मृत्यू

यवतमाळ:-येथील श्री वासंतराव नाईक शासकीय वैध्यकीय महाविध्यालय व रुग्णालया मधील औषध वैद्यकीय शास्त्र विभागाच्या माळ्यावरून रुग्ण सरळ खाली पडला आणी जागीच ठार झाल्याची घटना ही 23 फेबुरवारी 2023 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारात घडली घटनेची माहिती रुग्णालयात वार्यासारखी पसरली व बघ्यांची गर्दी ही फार जमली तात्काल वैध्यकीय अधिकार्यांना माहिती देण्यात आली व वैध्यकीय अधिकार्यानीं त्या रुग्णाला मृत घोषित केले.मृतदेह घटना स्थळावर जवळपास एक तास पडून राहिले परंतु पोलीस पंचनाम्यास पोहचली नाही वैध्यकीय अधिकार्यांनी पोलीस स्टेशन ला माहिति देऊन मृतदेहास शव विच्छेदन गृहात दाखल केले गजानन पवार असे मृतकाचे नावं असून तो राहणार आर्णी येथील होता अशी माहिती प्राप्त आहे.महा तथा रुग्णालयात वॉर्डा वॉर्डात जाऊन चहा विकणारे मागच्या बाजूने येऊन वार्ड मध्ये चहा विक्री करतात ते चाहा विक्रेता वॉर्ड मध्ये जाऊ नये अश्या विचाराणे रुग्णालंय प्रशासणाने खालच्या भागाला जाळी लावली परंतु वरच्या भागातून रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक तेथून पडतील व त्यांची जीवित हानी होतील असा विचार रुग्णालंय प्रशासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याच्या डोक्यात आला नाही जे नाही व्हायचे अखेर तेच झाले.या घटनेने सर्वत्र चर्चे चां विषय ठरत आहे,या प्रकरणी मुरुतकाच्या परिवारास तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे

Copyright ©