यवतमाळ सामाजिक

संत तुकाराम महाराज यात्रेनिमित्त तिरंगा रोषणाई ने घाटंजीकर आनंदमय

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

संत तुकाराम महाराज यात्रेनिमित्त तिरंगा रोषणाई ने घाटंजीकर आनंदमय

घाटंजी : शहरातील ग्रामदैवत श्री. संत मारुती महाराज व श्री. संत तुकाराम महाराज यात्रा महोत्सव 2023 ला भव्य सुरुवात झालेली असून संपूर्ण जिल्हाभरातील हजारो लोक यात्रेचा व दर्शनाचा लाभ घेत आहे. करिता संपूर्ण जिल्ह्यातील येणारे नागरिकांचे शहरात स्वागत करण्याचे हेतूने व शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन चौक ते शिवमंदिर पर्यंत तिरंगा रोषणाई पालिकेतर्फे करण्यात आलेली आहे. तसेच तिरंगा रोषणाई चे उद्घाटन श्री. दत्तात्रय मारावार यांचे हस्ते करण्यात आलेले
आहे. श्री. दत्तात्रय मारावार यांचे पूर्वजांनी संत मारुती महाराज यांचे यात्रेकरिता व आठवडी बाजार करिता किमती जागा नगर परिषदेला दान केलेले आहेत. आज ज्या ठिकाणी आठवडी बाजारातील भव्य असे व्यापारी संकुल व आजूबाजूची करोडो रुपये किमतीची जागा नगरपरिषदे ला दान दिलेली असल्यामुळे याची जाण ठेवून नगर परिषद प्रशासनाने दानी कुटुंबातील सदस्य श्री. दत्तात्रय मारावार यांचे हस्ते तिरंगा रोषणाई कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. बाळू खांडरे माजी नगराध्यक्ष माजी सैनिक श्रीराम गुल्हाने, संजू आडे आदी उपस्थित होते..

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©