यवतमाळ सामाजिक

काश्यपीच्या कार्याचा करण्यात आला सत्कार

काश्यपीच्या कार्याचा करण्यात आला सत्कार

 

शिक्षण सोबत काश्यपीने आपल्या वडिलांकडून व गुरुजनांकडून समाजहिताचे कार्य करण्याचे धडे आत्मसात केले.

 

यवतमाळ – उज्वल नगर मध्ये राहणारे विनोद दोंदल यांची बारा वर्षाची कन्या काश्यपी दोंदल ही निसर्गप्रति व समाजाप्रती करत असलेल्या हिच्या सामाजिक कार्याचा सत्कार करण्यात आला, काश्यपी ही सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे, शिक्षण सोबत तिने आपल्या वडिलांकडून व गुरुजनांकडून समाजहिताचे कार्य करण्याचे धडे आत्मसात केले, सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य जसे वृक्षारोपण करणे, ओसाड पडलेल्या जगलात फेकण्यासाठी सीड बॉल तयार करणे व शेटबॉल तयार करण्याची कार्यशाळा घेणे, कोरोना काळात गरजवंत लोकांना धान्य किटचे वाटप करणे, बिमार व्यक्तीनं मदत करणे, गरीब मुलांना पुस्तके, कपडे, खाऊच्या पदार्थांचे वाटप करणे, दिवाळीत दिनदुबळ्या व्यक्तीना फराळाच्या पदार्थाचे वाटप करणे, प्लास्टिक निर्मूलनात सहकार्य करणे, उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी पाणी पुरवठे तय्यार करणे, असेच एक ना अनेक सामाजिक कार्यात उपस्थित राहून स्वहस्ते उल्लेखनीय योगदान दिल्या बद्दल छोटी समाजसेविका काश्यपीचा आयोजन समिती पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य यांच्या कडून मानचिन्ह (ट्रॉफी) व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले, इतक्या लहान वयात काश्यपीचा होत असलेल्या सत्कार बघून उपस्थित मान्यवर अचंबित झाले वाहवाही करून तिने केलेल्या कार्यचे कौतुक करण्यात आले, मुलीचा होत असलेला सत्कार पाहून वडिलाचे आनंदाश्रू अनावर झाले,

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे पर्यावरण व समाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवकांचा सन्मान व सत्कार करण्यासाठी पर्यावरण संवर्धन व विकास समिती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विदर्भास्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करून करण्यात आले, ह्या कार्यक्रमात हिंगणघाट कृषी उत्पन्न समितीचे सभापती सुधीर कोठारी,पर्यावरण समितीचे संस्थापक डी. के. आरीकर, आतंरराष्ट्रीय पर्यावरण समितीचे अध्यक्ष देवा तांबे, प्रा.राजेश्वर राजूरकर, मुख्य संयोजक विदर्भ अध्यक्षा सुरेखा रडके, संत तुकाराम संस्थेचे अध्यक्ष गणेश्वर आरीकर, विनोद दोंदल, प्रकाश खुडसंगे, मनोहर बोभाटे, आशीष भोयर, शैलेश आडे, निलेश वाभीटकर, आकाश राऊत, विनोद सातपुते, विजया रोकडे, गजानन जिकर, विजया धोटे, समीक्षा मांडवकर व महेंद्र शिरोडे इत्यादी अनेक सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©