महाराष्ट्र सामाजिक

सह्याद्री संकुलातील विद्यार्थी उच्च पदस्थ होतील-खा. प्रतापराव पाटील चिखलीकर

लोहा प्रतिनिधी बापूसाहेब कापुरे 

सह्याद्री संकुलातील विद्यार्थी उच्च पदस्थ होतील-खा. प्रतापराव पाटील चिखलीकर

ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणारी सह्याद्री संकुल अतिशय कष्ठाने उभारले आहे शिस्त शिक्षण याच सोबत गुणवता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.सुदर्शन शिंदे यांनी सह्याद्री संकुळातव दर्जेदार शिक्षण मिळावे सोबत शिस्त संस्कार मिळावेत याची घेतलेली दक्षता वाखाण्याजोगी आहे येत्या काळात या संकुलाच्या येणारा रस्ता करून देऊ तसेच येथे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी उच्च पदस्थ होतील असा विश्वास जिल्ह्याचे खासदार उदघाटक प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला

लोहा -पारडी येथील सह्याद्री संकुलात विद्यार्थी स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते उदघाटक खा प्रतापराव पाटील चिखलीकर तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम ,उपनगराध्यक्ष दता वाले, पोलीस निरीक्षक संतोष तांबे, गटनेते करीम शेख, शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद पवार, नगरसेवक भास्कर पवार संस्थापक सुदर्शन शिंदे, सौ जयश्री शिंदे, डॉ. नामदेवराव दळवी, केशव गड्डुम ,श्री निवास द्यावरशेट्टी,भारत होकर्णे ,प्रा. शिवाजी उमाटे,महेश कुंटूरकर,. बाळासाहेब देशमुख, वानखेडे के. आर, . शेखर राजेगोरे, डॉ. शिवाजी गोरे, . गोविंदराव केंद्रे. शंतनू कैलासे,. भगवान पवळे. डॉ. दिपक मोटे , सुहास पा. टाकळकीकर.बँक अधिकारी अमोल चव्हाण, कैलास मुंडकर, श्याम साखरे, गजानन मस्के, पारडीचे सरपंच पवार, यासह मान्यवर उपस्थित होते

खासदार प्रतापराव पाटील यांनी सह्याद्री संकुलातील शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले आणि येथील विद्यार्थी उच्च पदस्थ होतील आपले शाळेचे आईवडिलांचे नाव उज्जवल करतील असा विश्वास व्यक्त करीत या शाळेच्या रस्त्याच प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासित केले प्रास्ताविक सौ वाडेवाले मॅडम यांनी केले .सुदर्शन शिंदे यांचे विद्यार्थी बँके अधिकारी अमोल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले आरंभी संस्था व संकुलाच्या वतीने जिल्ह्याचे खास चिखलीकर यांचे संस्थापक व संचालक सुदर्शन शिंदे व मुख्याध्यापिका सौ

जयश्री शिंदे यांनी सत्कार केला त्यानंतर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला शिवसेना नेते ऍड मुक्तेश्वर धोंडगे यांनीही भेट दिली व मनोगत व्यक्त केले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना खासदार चिखलीकर यांच्या हस्ते रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुरेख संचलन या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी कु.सह्याद्री शिंदे, अनुष्का वाघमारे,मानसी पदकोंडे धनश्री देवकर, वेदांत पाथरकर श्रावणी सोनवळे यांनी सुरेख लक्षवेधी संचलन केले मुख्याध्यापक नंदकिशोर मेकाले, मु.अ. प्रा. नागेश हिरास, साईकुमार दहिवाळ, सौ. रुक्मिणी धोंडगे, सौ. सुप्रिया नाईकवाडे, अमोल शिरसाट व शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©