यवतमाळ सामाजिक

सर्व धर्म समभाव म्हणून शांतीचा मार्ग स्विकारावा- अजगर अली 

सर्व धर्म समभाव म्हणून शांतीचा मार्ग स्विकारावा- अजगर अली 

यवतमाळ ः मर्कजी जमियत अहेले हदिस हिन्द दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता इमाम अझगर अली मैहदी सल्फी यांची यवतमाळ येथे जमियत अहेले हदिसचे कार्यकर्त्यां सोबत विशेष भेट हॉटेल राधामंगल येथे २४ फेब्रुवारी रोज पार पडली.जिलई जमियत अहेले हदीसचे अध्यक्ष मिर्झा नफीस बेग यांनी स्वागत भाषण करुन बैठकीचे प्रास्ताविक केले. तर अझगर अली मैहदी यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना इस्लाम धर्माने शांतीचा संदेश दिला असून सर्व धर्म समभाव म्हणून नागरिकांनी संघटीत राहुन शांतीचा मार्ग स्विकारावा असे आवाहन ही त्यांनी या प्रसंगी केले.

या बैठकीला विशेष अतिथी म्हणून नागपूर चे वकिल परवेज, अजमतुल्ला खान व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी मो. अफसर परवेज, काजी नुरुद्दीन, शेख नईम, दानिश बेग, सै. तौसिफ, सै. इमरान पटेल, फजरुल रहमान, मोहसनि शेख आदि उपस्थित होते यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©