यवतमाळ शैक्षणिक

लेट अल्ताफ अली काझी या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेह संमेल्लन

लेट अल्ताफ अली काझी या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेह संमेल्लन

 

लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल रुई वाई येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल रुई येथे सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेह संमेल्लन आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटक. तूनकलवार साहेब ठाणेदार ग्रामीण पोलिस स्टेशन यवतमाळ.हे होते .सर्व प्रथम उद्घाटक,अध्यक्ष,प्रमुख पाहुणे यांची एंट्री म्हणजे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत प्रमुख पाहुणे यांना विद्यार्थ्यांनी फुल टाकत शेतकरी च्या वेशभूषेत आणले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष. रुपेशभाऊ सावरकर जिल्हाध्यक्ष पोलिस पाटील संघटना यवतमाळ हे होते.

प्रमुख पाहुणे. प्रदीप राठोड एल आय सी अधिकारी पांढरकवडा हे होते.गजानन भाऊ डोमाळे उपसरपंच रुई हे होते

.जावेद अली काझी अध्यक्ष एकता बहुउद्देशीय संस्था रुई.

सुशिलजी कर्णेवार रुई,अपूर्व राठोड ग्राम सदस्य रुई, बाळुभाऊ राठोड शा.व्य.समितीअध्यक्ष रुई

प्रमोद भाऊ पुरी शासकीय अधिकारी यवतमाळ, इमदाद अली काझी उपाध्यक्ष एकता बहुउद्देशीय संस्था रुई, सुनील भाऊ राऊत सामाजिक कार्यकर्ते रुई.

वसीम भाऊ सय्यद, जगेश्र्वर साखरकर, वकील भाई सय्यद, देविदास जाधव तसेच असंख्य पालक व गावकरी उपस्थित होते.

ठाणेदार तनकुलवार साहेब आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करून स्नेह संमेल्लन चे थाटात उद्घाटन करण्यात आले.

दीप प्रज्वलन झाल्यानंतर पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक .ठाणेदार तनकुलवार यांचा सत्कार शाळेचे अध्यक्ष जावेद अली काझी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष.रुपेश भाऊ सावरकर जिल्हाध्यक्ष पोलिस पाटील संघटना यवतमाळ यांचा सत्कार शाळेचे अध्यक्ष जावेद अली काझी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.

प्रमुख पाहुणे. प्रदीप राठोड एल आय सी अधिकारी यांचा सत्कार शाळेचे सहायक शिक्षक नितेश डोकडे सर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

गजानन भाऊ डोमाळे उपसरपंच यांचे स्वागत सहाय्यक शिक्षिका कु कल्याणी करपती यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.बाळू भाऊ राठोड शा. व्य.समिती अध्यक्ष यांचे स्वागत निलेश भाऊ लोणकर यांनी केले.

शाळेचे अध्यक्ष जावेद अली काझी यांचे स्वागत पालक किशोर भाऊ राऊत यांनी केले .

सुशीलजी कर्णेवार यांचे स्वागत राजिक शेक यांनी केले

सुनील भाऊ राऊत यांचे स्वागत साईमा सय्यद यांनी केले

अपूर्व भाऊ राठोड यांचे स्वागत सहाय्यक शिक्षिका मयुरी रेणापूरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

शासकीय अधिकारी प्रमोद भाऊ पुरी यांचे स्वागत शाळेच्या संध्या ताई मोहळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

इमदाद अली काझी उपाध्यक्ष एकता बहुउद्देशीय संस्था यांचे स्वागत गजानन भाऊ गोंधळेकर यांनी केले.जगेस्वर साखरकर यांचे स्वागत हेमेश्वर भाऊ बहाले यांनी केले.

स्वागत संभारभ झाल्यानंतर सर्व प्रथम ठाणेदार साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांच्या शाळेच्या जुन्या आठवणी उजाळा देत सर्वांना मार्गदर्शन करून लेट अल्ताफ अली काझी स्कूल चे कौतुक केले.त्या नंतर एल आय सी ऑफिसर प्रदीप राठोड सर यांनी शिक्षणा बद्दल आणि शाळेच्या कार्य बद्दल आपले मत व्यक्त करीत विद्यार्थ्याचा सामजिक,सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकास अशाच कार्यक्रमाद्वारे, उपक्रमाव्दारे होत असते आणि अशे कार्यक्रम नेहमी माझे मित्र जावेद अली काझी आपल्या शाळेत राबवित असतात या शाळेला एक छोटीसी भेट देणगी देत चेक दिला.त्या नंतर अध्यक्षीय भाषण रुपेश भाऊ सावरकर जिल्हाध्यक्ष पोलिस पाटील संघटना यवतमाळ हे आपले विचार व्यक्त करीत असताना म्हणतात रुई हे छोटे से गाव असून शहरा प्रकारे गावातील गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून रुई गावातील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय जुनेद अली काझी यांनी इंग्रजी शिक्षणाची शाळा काढून पालक आणि गावातील विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल असे इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली.जुनेद अली काझी यांचे सामाजिक, शैशनिक कार्य खूप महान आहे.त्या नंतर कालांतराने सामाजिक कार्यकर्ते जुनेद अली काझी यांचे निधन झाले परंतु इथे यांचे कार्य थांबले नाही पाहिजे म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे शैशनिक कार्य चालू राहण्यासाठी त्यांचे छोटे बंधू जावेद अली काझी यांनी अविरत पणे चालू ठेवण्याचा संकल्प केला ही शाळा लहान असून या शाळेतून खूप चांगले विद्यार्थी घडतात ही खूप मोठी गोष्ट आहे.या शाळेचे विद्यार्थी राज्यस्तरीय ,जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अशा भरपूर स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त करून रुई या गावचे नाव लौकीक करीत आहे त्या मध्ये नृत्य स्पर्धा,मैदानी खेळ,चित्रकला स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धेत खूप मोठ्या प्रमाणात प्रावीण्य प्राप्त केले आहे अशा गावातील शाळेला सर्व गावकरी ,मित्रमंडळ,पुढारी,अधिकारी,यांनी भरपूर प्रमाणात मदत केली पाहिजे जसे आज या कार्यक्रमा निमित्त एल आय सी ऑफिसर प्रदीप राठोड सर यांनी देणगी देऊन खूप महान कार्य केले आहे.नक्कीच ही शाळा खूप छान आणि या शाळेचे शिक्षण पण खूप छान आहे असे दर्जेदार नियोजनबद्ध कार्यक्रम हुशार शाळेतील हुशार शिक्षक आणि विद्यार्थी राबवित असतात.छोट्याश्या वयात खूप मोठी जबाबदारी स्वीकारून संकटाचा डोंगर ओढून माझे मित्र जावेद काझी सर आपल्या मोठ्या भावाचे स्वर्गीय जुनेद भाई काझी यांचे स्वप्न सामाजिक,शैशनिक,सांस्कृतिक कार्य करीत आहे ही साधी गोष्ट नसून खूप महान कार्य आहे असे मनोगत जिल्हाध्यक्ष रुपेश भाऊ सावरकर पोलिस पाटील संघटना यवतमाळ यांनी व्यक्त करीत आपल्या अध्यक्षीय भाषणास विराम दिला.त्या नंतर सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी शेतकरी नृत्य सादर करून या नृत्यामध्ये शेतकरी यांचा राहणीमान त्यांचे जीवन,वेशभूषा यांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यानी प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे मन जिंकले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.शाळेच्या सहाय्यक शिक्षिका मयुरी रेनापुरकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक जावेद अली काझी तसेच सहाय्यक शिक्षक नितेश डोकडे ,सहाय्यक शिक्षिका कल्याणी करपती ,सहाय्यक शिक्षिका सानिया सय्यद ,सहाय्यक शिक्षिका साईमा सय्यद ,शिक्षक इतर कर्मचारी संध्या ताई मोहळे, राजिक शेक,पालक,गजानन गोंधळेकर,सय्यद वसीम,निलेश लोणकर,बंडू जवके,प्रफुल काळे,कैलास धाईस्कर,हेमेश्वर बहाले,किशोर राऊत,वकील शेक,मुज्जमिल शेख,प्रशांत केळकर,रवींद्र जुनघरे,अविनाश राऊत,वसीम खान,सुशील जैस्वाल,मनोज जैस्वाल,आणि विद्यार्थी गावकरी ,मित्रमंडळ इत्यादींनी परिश्रम घेतले.

Copyright ©