यवतमाळ राजकीय

विनोद पवार यांची यवतमाळ शहर प्रमुख पदी नियुक्ती 

विनोद पवार यांची यवतमाळ शहर प्रमुख पदी नियुक्ती 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आदेशाने शिवसेना यवतमाळ शहरांमधील यवतमाळ शहर प्रमुख म्हणून शहरातील व शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते विनोद पवार यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना नेते खा.अरविंद सावंत,अरविंद नेरकर पश्चिम विदर्भ समन्वयक, युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई, यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्रभाऊ गायकवाड, जिल्हा प्रमुख संतोषभाऊ ढवळे यांच्या शिफारसीवरून

विनोद पवार यवतमाळ शहर प्रमुख पदि नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शासकीय विश्रामगृह येते देण्यात आली.यावेळेस मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव ठाकरे यवतमाळ जिल्हातील पदाधिकारी मा. आ.बाळासाहेब मुनगीवार,बाळासाहेब चौधरी, मा.नगराध्यक्ष प्रवीण पांडे,उपजिल्हा प्रमुख.गजानन डोमाळे,उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे,उपजिल्हा प्रमुखअतुल गुल्हाने,शहर प्रमुख चेतन शिरसाट,शहरप्रमुख अमोल धोपेकर,संजय रंगे,कुणाल राडे,बिल्ला सोळंकी,कल्पनाताई दरवई,सागरताई पुरी,मंदाताई गाडेकर, इत्यादी उपस्थिती होती.

Copyright ©