महाराष्ट्र सामाजिक

लोहा येथे समता सैनिक दलाचे शिबिर संपन्न !

प्रतिनिधी बापूसाहेब कापुरे

लोहा येथे समता सैनिक दलाचे शिबिर संपन्न !

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा लोहा यांच्या वतीने शहरातील क्रांतीसुर्य बुद्ध विहार या ठिकाणी एक दिवसाचे समता सैनिक दलाचे एक दिवसीय शिबीर घेण्यात आले.

सकाळी भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष पी एम वाघमारे यांच्या हस्ते ध्वज ध्वजारोहण करून शिबिराला सुरुवात करण्यासाठी 25 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभा ग नोंदवला होता त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी मेजर संतोष दुंडे, विलास कांबळे, पंकज चावरे, यांनी प्रशिक्षण दिले या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष एस.एन शिनगारपुतळे, जिल्हा पर्यटन सचिव रत्नाकर महाबळे, तालुका सरचिटणीस बापूसाहेब कापुरे, कोषाध्यक्ष धोंडीबा यांनभुरे, माजी तालुकाध्यक्ष व्ही के कांबळे,ई जे बनसोडे यांनी उपस्थिती होती तर तालुक्याचे समता सैनिक दलाचे सचिव सुभाष खाडे यांनी भोजनदान दिले शेवटी सरणंत्तय गाथा घेऊन या शिबिराचा समारोप करण्यात आला.

Copyright ©