यवतमाळ सामाजिक

हिंदूराष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी कृतिशील होण्याचा आर्णी येथील धर्मप्रेमींचा निर्धार !

हिंदूराष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी कृतिशील होण्याचा आर्णी येथील धर्मप्रेमींचा निर्धार !

हिंदुवरील आघात थांबवण्यासाठी हिंदूराष्ट्राची आवश्यकता आहे. श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदू जनजागृती समिती.

भारत हे स्वयंभू हिंदू राष्ट्र आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन होऊन पाकिस्तान इस्लामी राष्ट्र बनले, तेंव्हाच भारत हे हिंदूराष्ट्र घोषित व्हायला हवे होते, मात्र तसे झाले नाही,उलट यावेळी हिंदू महिलांवर असंख्य अत्याचार झाले. 1976 ला संविधानात घटनादुरुस्ती करून सेक्युलर हा शब्द घालण्यात आला. तेंव्हापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत, अल्पसंख्यांना त्यांच्या शाळांमधून त्यांचा धर्म शिकवण्याची मुभा मिळाली, मात्र बहुसंख्य हिंदूंना धर्माशिक्षणापासून दूर ठेवण्यात आले. भारतात कायदे बहुसंख्य हिंदूंना तर फायदे अल्पसंख्यांना मिळत आहेत, मात्र भारत हा धर्मानिरपेक्ष देश आहे, असे शाळेत शिकवुन हिंदूंचा बुद्धीभेद केल्या जात आहे, त्यामुळे हिंदुवरील हे आघात थांबवण्यासाठी हिंदूराष्ट्राची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी केले. ते 22 फेब्रुवारीला रेणुका मंगल कार्यालय, आर्णी येथे पार पडलेल्या हिंदूराष्ट्र जागृती सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी हलाल अर्थव्यवस्थेचे देशाला असलेले धोके, शिवरायांच्या गड किल्ल्यावर होत असलेले इस्लामी अतिक्रमण, वक्फ बोर्डाला अतिक्रमण करण्यासाठी मिळालेले अमर्याद अधिकार आदी आघाता विषयी माहिती सांगितली.

शंखनाद, श्लोक आणि वेदमंत्रपठणाने सभेला प्रारंभ झाला. त्यानंतर रणरागिणी शाखेच्या सौ. गौरी जोशी यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतरण या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या मुंबईतील हिंदु तरुणी श्रद्धा वालकर हिचे लव्ह जिहाद च्या माध्यमातून 35 तुकडे करून निर्घून हत्या झाल्यावर सुद्धा अन्य एका हिंदू तरुणीचे 50 तुकडे करण्यात आले. सध्या महिला, मुली यांच्यामध्ये असुरक्षितरूपी भावना निर्माण झाली आहे. लव्ह जिहादला बॉलीवूड च्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत आहे, हिंदू तरुणींना धर्मप्रेम नसल्यामुळे त्या लव्ह जिहादला बळी पडत आहेत, त्यासाठी हिंदू तरुणी, महिला यांनी धर्माचरण करणे आवश्यक आहे, स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्वधर्म स्वभाषा संस्कृती जाणून घेतल्यास कुठलीही तरुणी किंवा स्त्री लव्ह जिहादला बळी पडणार नाही, असे सौ.जोशी म्हणाल्या.

*धर्माच्या कार्यासाठी हिंदू संघटनांनी एकत्र येणे आवश्यक आहे. – पूजनीय भगीरथी महाराज, संस्थापक अध्यक्ष, गुरुसेवा संस्थान, नागपूर*.

हिंदू संस्कृती विश्व कल्याणचा विचार करते, सेवा सुरक्षा संस्कार करायला सांगते, हिंदू संस्कृती सत्वगूणप्रधान आहे, मात्र धर्माचरणाच्या अभावामुळे हिंदूंवर अनेक आघात होत आहेत, कारण हिंदू समाज विखूरला आहे, त्यामुळे हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येवुन् कार्य करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन पूजनीय भगीरथी महाराज यांनी केले.

हिंदूंनी धर्माचरणी व्हावे आणि एकत्रित यावे, म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केले, मात्र हिंदूंच्या सार्वजनिक उत्सवामध्ये अनेक अपप्रकार शिरले. सध्या हिंदू समाज देव, देश, धर्माचे कार्य करण्याऐवजी ‘रोटी, कपडा और मकान’ मिळवण्यासाठी हिंदू धडपडत आहे. त्यामुळे जात पात मतभेद विसरून आदर्श सनातन धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या सभेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पूजनीय अशोक पात्रीकर, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला 400 हून अधिक महिला पुरुष उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©