यवतमाळ सामाजिक

“संत गाडगेबाबा यांची कीर्तन चळवळ म्हणजे बहुजन उत्थानाचा जिवंत झरा ” – डॉ. माणिक मानकर

“संत गाडगेबाबा यांची कीर्तन चळवळ म्हणजे बहुजन उत्थानाचा जिवंत झरा ” – डॉ. माणिक मानकर

यवतमाळ :- श्री गुरुदेव सेवा मंडळ, मंगरूळ , ता.जि. यवतमाळ, नोंदणी क्रमांक एफ- २०९३८ द्वारा वैराग्य मूर्ती, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या १४७ व्या जयंतीचे औचित्य साधून गावांमधून प्रभातफेरी व ग्रामसफाईचे आयोजन करण्यात आले होते.

प्रभात समयी निघालेली रामधून व प्रभातफेरी संपूर्ण गावातून जयघोषाच्या निनादात प्रसन्न व मंगल वातावरण निर्माण करीत होती. सुहासिनी भगवान गौतम बुद्ध, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करीत होत्या. रस्त्यांवर सडा संमार्जन करून रांगोळ्यांचे सुंदर रेखाटन केले होते. महाराजांच्या दशसुत्री, अंधानुकरणाचे विचार ध्वनिक्षेपक यंत्रावरून गावकऱ्यांपर्यंत पोहोचत होते. गावकऱ्यांचा मोठा सहभाग ग्रामसफाई या उपक्रमात होता.

फेरीचा सांगता समारोह मारोती मंदिराच्या प्रांगणात झाला. गाडगेबाबा हे बहुजनांचे उद्धारक होते. दीन दलितांच्या मुलांनी शिक्षणाची कास धरावी. हजारो वर्षे गुलाम म्हणून जगलेल्या समाजाने गुलामी सोडून दिली पाहिजे तसेच महाराजांची कीर्तन चळवळ ही खरी समाज उद्धारणारी व प्रबोधन करणारी प्रणाली आहे. असे डॉ माणिक मानकर यांनी प्रसंगानुरूप मनोगत व्यक्त केले.

माणुसकी ही प्रत्येक माणसात असते पण कधीकधी तो अमानुषपणे वागतो याचे वास्तव म्हणजे अज्ञानपण होय. या अज्ञानाच्या छायेत माणूस स्व-ला हरवून अंधश्रद्धेकडे वळतो आणि ती त्यालाच नाहीतर अनेक पिढ्यांना घातक ठरते. असे सुतोवाच संजय कांबळे यांनी जयंती निमित्त केले.

विठ्ठल कोडापे, नारायण सूर्यकार, ताराचंद चव्हाण, बबन चव्हाण, डॉ अनंतकुमार सूर्यकार, डॉ माणिक मानकर, संजय कांबळे, रामेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, महादेव तुमडाम, गणेश सोनोने, डॉ . बोबडे,सुनील गिरपुंजे, वसंत वनवे, दिगंबर इंगोले, अवधूत गवळी, पंकज पोहोरकर, दत्ता इंगळे, मिलिंद ठाकरे, मारोती पवूळ, मोहन ठाकरे, गोपाल उईके, दीपक हारे, पंडित काळे, नामदेव गावंडे, अभय सोनटक्के , गणेश बनकर, गणेश जोगे, रूपेश चव्हाण, रामदास मडावी, गजानन मोडले, शेट्टी जाधव, दिलीप मोडले, अनिल अवझाडे, सचिन पवूळ, गजानन मोडले, प्रकाश जाचक, साहील खेरे, प्रतीक इंगळे, ओम गावंडे, देवा पोहोरकर, रूद्रा खेरे, साहू इंगळे, बहिणाबाई कोडापे, राधाबाई मोडले, जाचकताई, सुमित्रा मोडले, कांताबाई मोडले, अनसूया निकम, गुघाणेताई, गंगाबाई डोंगरावर, गौराताई नेवारे, बकुबाई सोनोने व गावातील बहुसंख्य नागरिक व बाल मंडळी प्रसंगी उपस्थित होते.

सूत्रसंचालन डॉ अनंतकुमार सूर्यकार यांनी तर ऋण निर्देशन अरूण सोनटक्के यांनी केले.

शेवटी पसायदानाने व जय घोषाने जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली

Copyright ©