यवतमाळ सामाजिक

संत मारोती महाराज व संत तुकाराम महाराज यांचे यात्रेला सुरुवात तसेच I LOVE GHATANJI’ च्या नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

संत मारोती महाराज व संत तुकाराम महाराज यांचे यात्रेला सुरुवात तसेच I LOVE GHATANJI’ च्या नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

घाटंजी :शहरातील ग्राम दैवत ब्रह्मलीन संत मारोती महाराज व ब्रह्मलीन संत तुकाराम महाराज यात्रा महोत्सव २०२३ ला सुरुवात झालेली असून यात्रेचे उद्घाटन दि. २२.०२.२०२३ ला सायंकाळी ०६.०० वाजता मुख्याधिकारी श्री. अमोल माळकर यांचे हस्ते करण्यात आले. शहरातील यात्रेची परंपरा मागील ६० ते ७० वर्षापासून असून शेकडो विविध रंगीबेरंगी व दुर्मिळ वस्तू यात्रे मध्ये विकण्यास उपलब्ध असतात या यात्रेची खासियत अशी आहे कि यात्रेमध्ये युनिक व अँटिक वस्तू विक्री करिता उपलब्ध असते करिता या यात्रेची ख्याती संपूर्ण जिल्हाभर आहे , तसेच लहान मुले व युवक यांचे मनोरंजना करिता विविध झुले , सर्कस , गेम खेळ येथे उपलब्ध आहे. तसेच ब्रह्मलीन संत मारोती महाराज यांचे नावावर नगर परिषदेस किमती जागा दानामध्ये मिळालेली आहे याचीच उपराई करण्याचे हेतूने संत मारोती महाराज मंदिराचे व्यवस्थापन व यात्राचे व्यवस्थापन नगर परिषदे मार्फत करण्यात येते. संत मारोती महाराज यांची समाधी आठवडी बाजार येथे असुन जागे अभावी यात्रेचे नियोजन कृषी उत्पन बाजार समितीचे मागे बैल बाजार परिसर मध्ये करण्यात आलेले आहे व न. प. प्रशानातर्फे यात्रेमध्ये नागरिकांचे सोयीकरिता ब्रह्मलीन संत मारोती महाराज व ब्रह्मलीन संत तुकाराम महाराज यांचे दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ३० ते ४० वर्षापूर्वी बैल बाजार परिसरामध्ये यात्रा भरविण्यात येत होती. हाच योग पुन्हा ४० वर्षाने आल्यामुळे व तसेच घाटंजी शहरवासिया कारिता केंद्र व राज्य शासनाचे अमृत २.० योजनेंतर्गत ४९.८८ कोटी रु. ची पाणी पुरवठा योजना ब्रह्मलीन संत मारोती महाराज व ब्रह्मलीन संत तुकाराम महाराज घटस्थापना व यात्रा कालावधी दिवशी मंजूर झालेली असल्यामुळे नागरीकामध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे व तसेच मंदिर सभोवतील संपूर्ण अतिक्रमण काढून संत मारोती महाराज यांचे नावाचा डीजीटल बोर्ड , सुंदर झाडे व तार फेन्सिंग करून परिसर अतिक्रमण मुक्त केलेले आहे. तसेच यात्रेमध्ये संपूर्ण तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिक येणार असल्यामुळे शहराचे सौंदर्य वाढविण्याचे दृष्टीने जयस्तंभ चौक येथे ‘I LOVE GHATNJI’ च्या फलकाचे अनावरण शहरातील माजी सैनिक श्री. मधुकर भगत साहेब , श्री. उत्तमराव अंडर्स्कर साहेब , श्री. प्रमोद चौधरी साहेब , श्री. बनसोड साहेब , श्री. गुल्हाने साहेब व श्री. मोतीराम कुळसंगे साहेब यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जय स्तंभ चौकात माजी सैनिक यांचे हस्ते उद्धाटन करावयास मिळत आहे हे आमचे भाग्य असल्याचे मनोगत मुखाधिकारी अमोल माळकर यांनी व्यक्त केले. व ब्रह्मलीन संत मारोती महाराज व ब्रह्मलीन संत तुकाराम महाराज यात्रेचा व दर्शनाचा लाभ सर्व नागरिकांनी घेण्याचे आव्हान करण्यात आले. याप्रसंगी बाळू भाऊ खांडरे , अंकुश ठाकरे , पत्रकार काज्जूम कुरेशी , बंडू तोडसाम , संजू आडे , विजय रामटेके, यात्रा ठेकेदार रिजवान पप्पुवाले व गावातील संपूर्ण नागरिक उपस्थित होते. यात्रा नियोजन व ‘I LOVE GHATNJI’ चे कार्यक्रमाकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता तथा यात्रा नियोजन नोडल अधिकारी राजू घोडके यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व उपस्थित नागरिकांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता प्रकाश घोती , शंकर नेहारे , अनिल पाईलवार , प्रवीण हातमोडे , नितीन हातमोडे , रोशन तायडे , नितीन बोपटे , नविन देशटटीवार , अक्षय वातीले , बंटी गवाई , संतोष जाधव , धनुभाऊ पेटेवार , गोलूभाऊ फुसे यांनी परिश्रम घेतले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©