यवतमाळ सामाजिक

यवतमाळ येथील दत्त हॉस्पिटल मध्ये प्रथमच दुर्बिणद्वारे किडनी स्टोन यशस्वी शस्त्रक्रिया 

यवतमाळ येथील दत्त हॉस्पिटल मध्ये प्रथमच दुर्बिणद्वारे किडनी स्टोन यशस्वी शस्त्रक्रिया 

यवतमाळ : वैद्यकीय क्षेत्रात विविध तंत्रज्ञान विकसित होत असताना यवतमाळ येथील श्री दत्त हॉस्पिटल मध्ये डॉ. प्रतीक प्रमोद चिरडे यांनी आपल्या कैशल्याचा वापर करून पासष्ट वर्षीय रुग्णावर प्रथमच किडनी स्टोनची दुर्बीणद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

लघवी मधून रक्त जाणे व पोटातील असह्य वेदनेने त्रस्त असलेला एक पासष्ट वर्षीय पुरुष रुग्ण यवतमाळ येथील दत्त हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल झाला. प्रसिद्ध युरोलोजिस्ट डॉ प्रतीक प्रमोद चिरडे यांनी तातडीने प्रारंभिक उपचार सुरू केले. दरम्यान किडनी तून मुत्र वाहून नेणाऱ्या नळीत स्टोन अडकल्याने डाव्या किडनीवर प्रचंड दाब निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे त्या रुग्णाच्या डाव्या किडनी चे दोन भाग असून दोन विभिन्न नलिका ( ureters) आढळल्या ( Partial duplication of left renal system ). अशा दुर्मीळ विशिष्ट शरीर रचनेच्या रुग्णाची शस्त्रक्रिया जटील आणि आव्हानात्मक होती. तेव्हा डॉ. प्रतीक चिरडे यांनी आपल्या कौशल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लघवीच्या मार्गाने दुर्बीणद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले योजने अंतर्गत सदर सर्व सामान्य व गरजू रुग्णाला उच्च दर्जाची युरोलॉजी सुविधा श्री दत्त हॉस्पिटल मध्ये विनामूल्य मिळाल्याने रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©