यवतमाळ सामाजिक

आखेर बेपत्ता मुलगी राळेगाव येथे सापडली कुटुंबीयांसह पोलिसांनी सोडला सुटकेचा श्वास.

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

आखेर बेपत्ता मुलगी राळेगाव येथे सापडली कुटुंबीयांसह पोलिसांनी सोडला सुटकेचा श्वास.

घाटंजी:शहरातून २१ फेब्रुवारीला अचानक विराली बेपत्ता झाली होती. २२ तासांच्या यशस्वी प्रयत्नानंतर विराली सुखरूप घरी पोहोचली आहे. त्यानंतर कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.घाटंजी येथील एका कुटुंबातील अल्पवयीन मुलगी अचानक घरून निघून गेली. ही बाब कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी शोधाशोध सुरू केली. सदर घटना गावातील मित्रपरिवार व नातेवाईकांना कळविण्यात आली. मात्र मुलगी आढळून न आल्याने या मुलीचे छायाचित्र व नाव टाकून कुणाला आढळल्यास संपर्क करावा, अशी साद सोशल मीडियावर घालण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच शहरातील नागरिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बेपत्ता मुलीच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र मुलीचा थांगपत्ता लागत नसल्याने विविध चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, मुलीचा शोध

घाटंजी पोलीसठाण्यावर लोकांचा जमाव वाढला विराली चा पत्ता लागत नसल्याने कुटुंबीयाने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. या घटनेचा चौफेर तपास पोलिसांनी सुरू केला. शहरातील सर्व भागातील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून काही संशयास्पद आजीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. मात्र कुठलाही तपासाचा धागा पोलिसांना गवसत नव्हता. त्यामुळे जिल्हा पोलीस दलामार्फत शोधपत्रिका प्रसारित करण्यात आली.

कर्मचाऱ्यांची अल्प संख्या असतानाही नागरिकांशी संवाद साधून त्यांना शांत केले. जशी जशी वेळ निघून जात होती, तेव्हा मुलगी नेमकी कुठे असेल, ती सुखरूप आहे का, याची चिंता कुटुंबीयांना सतावून हृदयाचे ठोके वाढवित होती. दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय मात्र त्या मुलीच्या विविध चर्चेला पूर्णविराम देणारा ठरल्यामुळे घाटंजीकरांनी सुटकेचा श्वास घेतला. सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बेपत्ता मुलगी राळेगाव शहरात सापडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घाटंजी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता राळेगाव गाठून मुलीला सोबत घेतले. तिची घाटंजी पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली. मुलीची सुखरूप घरवापसी झाली असली २२ तासांपर्यंत अख्खे शहर आणि प्रशासन चिंतेत होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©