यवतमाळ सामाजिक

जवळा येथील बोगस IGM कॉम्प्युटर संगणक टायपिंग इंस्टिट्युटची मनमानी

जवळा येथील बोगस IGM कॉम्प्युटर संगणक टायपिंग इंस्टिट्युटची मनमानी

विद्यार्थी-पालकांची दिशाभूल करणाऱ्या

त्या संस्थेवर फौजदारी कारवाई करा

दोन संगणक टंकलेखन संस्थेची मान्यता रद्द

यवतमाळ : आर्णी येथील दोन टंकलेखन संस्थाची मान्यता शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी रद्द केली. याचा शिक्कामोर्तब झाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली होती. तरी देखील कारवाईला न जूमानता त्या संस्थेने नियमबाह्य विनामान्यता संगणक टायपिंग कोर्स चालू ठेवला व गेल्या सञात व चालू अनाधिकृत विद्यार्थीचा प्रवेश घेवून मनमानी करीत आहे. त्या संस्थेवर तात्काळ फौजदारी कारवाई व्‍हावी, अशी मागणी २२ फेब्रुवारी रोजी सुदेश सालोडे यांनी आर्णी पोलिस ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सुदेश रामचंद्र सालोडे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांनी तक्रारीत नमुद केले की, आर्णी तालुक्यातील जवळा येथील IGM कॉम्प्युटर या संस्थेस शिक्षण विभागाकडून शासकीय वाणिज्य संगणक टायपिंग संस्थेच्या नियमावलीनुसार मान्यता प्रदान केलेली नाही. त्यामुळे IGM कॉम्पुटर यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या GCC-TBC संगणक टायपिंग चालविण्याची मान्यता नसतांना सुद्धा IGM कॉम्पुटरचे हे विद्यार्थी व पालक वर्गाची फसवणूक करून दिशाभूल करण्याचे काम हे करीत आहे. मान्यता नसतांना सुद्धा GCC-TBC संगणक टायपिंगला विद्यार्थी प्रविष्ठ करितात या मुळे मला खूप आर्थिक नुकसान होत आहे. जवळा या ठिकाणी एकमेव निर्मल कॉम्पुटर यांना संगणक GCC-TBC कोर्स चालविण्याची शिक्षण विभागाकडून मान्यता असलेली संस्था आहे. IGM कॉम्पुटरचे चालक गणेश दादाराव मनवर हे विद्यार्थी व पालक वर्गाची दिशाभूल करून विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतात. igm कॉम्पुटर सेंटर(अनधिकृत)या विद्यार्थी बसविल्यामुळे आर्णी येथील येरावार व मंगरूळ (कारखाना) या दोन्ही संस्थेची मान्यता मागील दिनांक १६/०६/२०२२ शिक्षण उपसंचालक अमरावती मान्यता रद्द केली. तरी पण igm कॉम्पुटर सेंटर (अनधिकृत ) या संस्थाचालक कुठलाही फरक पडला नाही तरी विद्यार्थी व पालक आणि अधिकृत संस्थाचालकांची सर्रास फसवणूक करीत आहे . तरी ठाणेदार यांनी सदर igm संस्थाचालक शिक्षण क्षेत्रात फसवणूक कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुदेश सालोडे यांनी केली. याबाबत त्यांनी शिक्षणअधिकारी शिक्षण विभाग जि.प. यवतमाळ, पोलिस अधिक्षक कार्यालय यवतमाळ यांना पाठविली आहे. तरी परिसरातील मान्यता असलेल्या संस्था मध्ये प्रवेश घ्यावा बोगस संस्था मध्ये प्रवेश घेवून नुकसान करू नका

Copyright ©