यवतमाळ सामाजिक

चिखलवर्धा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव साजरा करण्यात आले

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

चिखलवर्धा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव साजरा करण्यात आले

घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे सर्व समाजातील बांधवानी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.चिखलवर्धा येथे सर्व जाती धर्मातील बांधवानी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन पटलावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंचा कु.वर्षा कनाके या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण,सुधाकर चव्हाण,उपसरपंच आकाश नडपेलवार राजू बच्चूवार यांचे सह सचिन केळझरकर, विजय कनाके,विशाल घोडाम, प्रितम बहादे,आकाश तलांडे,सुनिल कुमरे, हाफी साहब, वाजिदभाई,मोईज पटेल,लक्ष्मण केळझरकर,अबरार पटेल,जुबेर खान,वसीम पठाण,रमेश राठोड,विठ्ठल केळझरकर,करण बोटरे,दिलीप सोयाम, बंडू कुंभेकर किशोर कोवे, मारोती मडावीइत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू कनाके यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश नडपेलवार यांनी मानले.

Copyright ©