यवतमाळ सामाजिक

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती परिक्षेच्या वेळेत बदल

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती परिक्षेच्या वेळेत बदल

१ मार्च पासून हेल्मेट सक्ती

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून विनम्र अभिवादन केले

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षेच्या वेळेत बदल

प्रश्नपत्रिका वाचनासाठी मिळणारा १० मिनिटे वेळ रद्द

सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून दिली  यवतमाळ, दि. २० फेब्रुवारी : – उच्च माध्यमिक व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचनासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.परंतु प्रश्नपत्रिका मोबाईल तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या घटना घडल्यामुळे परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी –मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करुन त्याएवजी सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात आली आहेत.परिक्षार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपी मुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी –मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द केली आहे.

तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करुन सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात आली आहेत. परिक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित रहावे. फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून सकाळ सत्रात सकाळी ११ वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी ३ वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. असे राज्य मंडळ, पुणे यांच्या कडून कळविण्यात आलेले आहे

१ मार्चपासून दुचाकी स्वारांना जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक

यवतमाळ, दि २० फेब्रु:- वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ आणि रस्ते चांगले झाल्यामुळे वाहनांचा अती वेग यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. अपघात होण्यात दुचाकी स्वारांची संख्या जास्त आहे. हेल्मेट न वापरल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही मोठे आहे. अपघातात होणा-या मृत्युस प्रतिबंध घालण्यासाठी दुचाकी स्वारांना हेल्मेट वापरणे १ मार्चपासून बंधनकारक करण्यात आले आहे आहे.   यवतमाळ जिल्हयामध्ये वाहनांच्या संख्येत व त्याअनुषंगाने रस्त्यावरिल वाहन अपघाताच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. आजपर्यंत ५ लक्ष ०३ हजार ७२५ खाजगी वाहने व ३१ हजार ३२२ मालवाहु व प्रवासी वाहने नोंदणी झाली आहे. यात दिवसेदिवस वाढ होत आहे, जिल्हयातील रस्त्याची स्थिती चांगली असल्याने तसेच बहुतांशी रस्ते, महामार्ग सिमेंट क्राँक्रीटचे बनले आहे. यामुळे वाहनचालकाने वाहने अतिवेगाने भरधाव चालविणे, चारचाकी वाहन चालवितांना सिट बेल्ट न बांधणे, दारु पिऊन वाहन चालविणे, चुकीच्या किंवा उलट दिशेने वाहन चालविणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेकींग करणे याबाबीमुळे प्रामुख्याने अपघात होत असल्याचे दिसुन आले आहे. यामुळे बहुतांशी अपघात होत आहे.

यवतमाळ जिल्हयामध्ये सन २०२२ यावर्षात ६६२ वाहनाचे अपघात घडले असुन त्यामध्ये ४२६ मृत्युमुखी व ५८६ गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमीपैकी अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघात झाल्यानंतर तसेच त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तिचा जीव गमावल्यामुळे सर्व कुटुंबावर प्रचंड आर्थिक व मानसिक आघात होतो, त्यांची हानी होते. ती कधीच भरुन निघणारी नसते.

वाहन अपघातात मृत्यु होणा-यांची संख्या लक्षात घेता, ७० टक्के अपघातामध्ये दुचाकी चालकांचा मृत्यु डोक्यावर हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे दिसुन येते. विशेष करुन दुचाकीस्वारास अथवा त्याचे मागील सिटवर बसलेल्या व्यक्तिच्या डोक्यास मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यु झालेला आहे.

जिल्हयातील अपघातांच्या संख्येत तसेच त्यामध्ये मृत्यु व जखमी व्यक्तींच्या संख्येत मासिक ३० टक्के कमी करण्याचे दृष्टीने परिवहन विभागाकडुन मोटार वाहन नियमांचे पालन न करणा-या वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

 

१ मार्चपासुन जिल्हयातील यवतमाळशहर व १५ तालूक्यातील मुख्य व इतर सर्व रस्त्यावर दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. परिवहन विभागातीलवायुवेग पथकाव्दारे मोटार वाहन निरिक्षक व सहा. मोटार वाहन निरिक्षक यांचे कडुन हेल्मेट तपासणी बाबत सध्या सुरु असलेल्या कारवाईपेक्षा कडक कार्यवाही करण्यात येईल. तेव्हा दुचाकी स्वारांनी चांगल्या प्रतीचे हेल्मेट परिधान करुनच प्रवास करावा.

अन्यथा सदर दुचाकी चालकावर मोटार वाहन कायदयानुसार दंड व अनुज्ञप्ती निलंबनाचीकारवाई करण्यात येईल. तसेच त्यास २ तास समुपदेशन केल्यानंतर त्याला पुढील प्रवास करु न देता, परत पाठवुन हेल्मेट परिधान केल्यानंतरच पुढील प्रवासाची अनुमती देण्यात येईल.

तेव्हा सर्व दुचाकीस्वारांनी यापुढे हेल्मेटचा वापर कटाक्षाने करुन आपल्या विरुध्दची दंडात्मक कारवाई टाळावी. तसेच पुन्हा घरी परत जावुन हेल्मेट परिधान करुन येणे यांकरिता लागणारा वेळ व होणारा त्रास वाचवावा. यासोबतच सिटबेल्ट न वापरणे तसेच अतिवेगाने वाहन चालविणे व इतर गुन्हयाबाबतची कारवाईत वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे

यामागे जनतेस त्रास देण्याचा हेतु नसुन अपघातांची संख्या कमी करणे, मृत्यु व जखमी होणारे व्यक्तींची संख्या कमी करणे एवढाच आहे. त्यामुळे सर्व जनतेने यामध्ये सहभागी व्हावे व अपघात मुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टीने हेल्मेट परिधान करुन सहकार्य करावे.

Copyright ©