यवतमाळ सामाजिक

गुरुदेव सेवा मंडळ, मंगरूळ तर्फे शिवजयंती साजरी

गुरुदेव सेवा मंडळ, मंगरूळ तर्फे शिवजयंती साजरी

यवतमाळ :- श्री गुरुदेव सेवा मंडळ, मंगरूळ ता.जि. यवतमाळ नोंदणी क्रमांक एफ- २०९३८ तर्फे ‘ शिवजयंती ‘ उत्सव जल्लोषात मारोती मंदिराच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.

मराठी माणसाची अस्मिता जोपासणारे एकमेव धुरंधर राजनीतीज्ञ व सामाजिक भान असणारे एकमेव प्रजाहित दक्ष राजे म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले होय. ज्यांच्या राज्यात मराठी स्त्री स्वाभिमानानी जगत होती ते राज्य म्हणजे शिवशाही साम्राज्य होय. दीन- दलितांवर होत असलेल्या अत्याचाराची दखल घेणारा एकमेवाद्वीत राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितले जाते. असे प्रसंगोचित विधान संजय कांबळे यांनी केले.

सर्व प्रथम सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. प्रार्थनेनंतर उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या व राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला पुष्पमाला व पुष्पे अर्पण करून अभिवादन केले.

प्रसंगी संजय कांबळे,विठ्ठल कोडापे, ताराचंद चव्हाण, नारायण सूर्यकार, रामेश्वर गावंडे , ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, महादेव तुमडाम,भूषण सोनटक्के, सुनील गिरपुंजे, गजानन मोडले, गणेश सोनोने, दिलीप मोडले, उत्तम सोनटक्के , दिगंबर इंगोले, अवधूत गवळी, डॉ अनंतकुमार सूर्यकार, बहिणाबाई कोडापे, सुमित्रा मोडले, कांताबाई मोडले, राधाबाई मोडले, गौराबाई नेवारे, बकुबाई सोनोने, गुघाणेकाकू तसेच बहुसंख्य नागरिक व बाल मंडळी उपस्थित होते.

बहारदार सूत्रसंचालन अरूण सोनटक्के यांनी तर आभार ज्ञानेश्वर कोडापे यांनी पार पाडले.

राष्ट्रवंदनेने व शिव जय घोषांनी शिव जयंती उत्सवाची सांगता झाली.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©