यवतमाळ सामाजिक

दिग्रस येथील शिव मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांच्या रांगाच रांगा

दिग्रस येथील शिव मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांच्या रांगाच रांगा

भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये महाशिवरात्रीला बहुमूल्य महत्त्व असून महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्र उत्सव संपुर्ण देशात मोठया उत्साहात साजरा केल्या गेला. या वेळेसचा महाशिवरात्र उत्सव दिग्रस येथे गेल्या महिन्याभरापासून प्रत्येक शिवंदिरात दर्शन पूजन करण्यासाठी महिला मंडळीच्या रांगाच रांगा दिसुन आल्या. शहरा बाहेरील कर्णेश्वर महादेव मंदिर व मोक्षधाम येथील शिव मंदिरात दर सोमवार ला महाआरती करिता भाविक भक्तांची मोठ्या संख्येत उपस्थिती असायची.रोज सकाळी भल्या पहाटे उठून भक्ती भावे पूजाअर्चा करण्या करिता महिला मंडळींची धडपड दिसुन येत.महाशिवरात्री दिनी एकादशी निमित्त सम्पूर्ण शहरातील शिवालयात मल्लिकार्जुन महादेव संस्थान,भवानी माता टेकडी, पाळेश्वर महादेव संस्थान,कर्णेश्वर महादेव संस्थान, हर हर महादेव संस्थान, कुंभकेश्वर महादेव मंदिर, मोक्षधाम येथील शिवमंदिर, नाग मंदीर, या सह इतर सर्व शिव मंदिरात ,भाविक भक्तांनसाठी शाबुदान खिचडी, फळाळी चिवडा व फळ ठेवण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्णेश्वर महादेव संस्थान कडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते

Copyright ©