यवतमाळ सामाजिक

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलिस निरीक्षक सुषमाताई बाविस्कर यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलिस निरीक्षक सुषमाताई बाविस्कर यांच्या हस्ते संपन्न

घाटंजी येथून जवळच असलेल्या व पुरातन नृसिंह मंदिर असलेल्या अंजी येथे आज दि 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता राजे छत्रपती उत्सव समिती व एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर व तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून घाटंजी पोलीस स्टेशनच्या प्रभारी ठाणेदार सुषमा बाविस्कर, शुभांगी मुकेश भोयर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला यात तब्बल 35 लोकांनी आपले रक्तदान करून राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति असलेले प्रेम व्यक्त केले तर याच पाहुण्यांच्या हस्ते गावातील प्रमुख ठिकाणी अतिशय मनमोहक असे तैलचित्राचे अनावरण सुद्धा ठाणेदार सुषमा बाविस्कर व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात अंजी येथील गावकरी व शिवभक्त मंडळी उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी 20 वर्ष आतील मुलांच्या पोवाडा गायन स्पर्धेला सुरुवात करण्यात आले.

Copyright ©