यवतमाळ सामाजिक

डॉ.अंजली गवार्ले इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये

डॉ.अंजली गवार्ले इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये

डॉ.अंजली गवाले, एम.एस. (शल्य), गवार्ले पाईल्स हॉस्पीटलच्या डायरेक्टर यांनी भगंदर, मुळव्याध या व्याधीसाठी सर्वाधिक स्त्रीयांच्या क्षारसुत्र या आयुर्वेदीक पध्दतीने शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम नोंदविला आहे. ह्या विदर्भातील प्रथम तसेच वैद्यकिय क्षेत्रातीलही अशा प्रकारचा विक्रम नोंदविणाऱ्या प्रथम महिला आहेत.

त्याबद्दल श्री.मदन येरावार सर यांनी तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे सदस्य, ज्युरी व युनिक पब्लिकेशनचे संपादक डॉ.चंद्रकांत हीवरे यांनी डॉ.अंजली गवार्ले यांना, मेडल, पेन, प्रमाणपत्र व बॅच बहाल केले. यवतमाळकराचे भुषण म्हणुन यवतमाळचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविल्या गेले. याबद्दल श्री.मदन येरावार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मायाताई शेटे, उषा खटी, रेखा कोठेकर, प्राजक्ता राऊत तसेच डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ.कविता बोरकर उपस्थित होत्या. जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचा महाराष्ट्रदिनी गौरव करण्यात येणार आहे.

जिल्हा माहिती अधिकारी सौ.मनिषा साबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Copyright ©