यवतमाळ सामाजिक

शिव जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर

शिव जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळला रायगडाची प्रचिती येते संपूर्ण यवतमाळ हे शिवमय होऊन जाते त्यातच खूप वर्षापासून संभाजी ब्रिगेड हे खरे शिवराय लोकापर्यंत पोहोचले पाहिजे याचा सातत्याने प्रयत्न करत असतात शिवरायांना केवळ मानवंदना किंवा हार अर्पण करून आपले काम संपत नाही तर ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपले रक्त सांडवले त्यांचा स्वाभिमान आणि अभिमान उराशी बाळगून यवतमाळ येथे सुरज खोब्रागडे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन केले आहे शिवजन्माच्या दिनी 19 फेब्रुवारी 2023 शिवतीर्थ गार्डन रोड यवतमाळ येथे होणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये असणाऱ्या जनसामान्यांच्या काबाडकष्ट करून जगणाऱ्या लोकांसाठी ज्यांचा कोणीच आज वाली नाही अशा लोकांसाठी रक्तदान करून त्यांना जीवन द्यावे कारण या धकापकीच्या जीवनात आणि कम्प्युटरच्या युगात सर्व प्रकारच्या कारखाने निर्माण झाले आहे परंतु जगाच्या पटलावर कुठेही रक्ताचा कारखाना निर्माण झाला नाही तो निर्माण होणार नाही म्हणूनच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला जर जुडाचे असेल तर रक्तदान करून जीवनदान द्यावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे यांनी समस्त जनतेला केले आहे या रक्तदान शिबिरासाठी दिवस रात्र मेहनत करणारे अजय गावंडे ,सचिन मनोहर, पाटे सर ,राणा गायकवाड, कुणाल बोपचे, शुभम पाटील, चेतन भगत, आकाश घोडे ,सतीश राऊत, विकास लसते, किशोर ठाकरे, प्रशांत ठाकरे, प्रशांत कदम, अनिकेत मेश्राम, सुरज पाटील, संजय जीवने इत्यादी संभाजी ब्रिगेडचे संपूर्ण कार्यकर्ते करीत आहात तरी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराजांना मानवंदना द्यावी ही विनंती

Copyright ©