यवतमाळ शैक्षणिक

युसीमॉस अबॅकस नॅशनल स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

युसीमॉस अबॅकस नॅशनल स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

यवतमाळ ः रचना कलंत्री द्वारा संचालित अवधुत विहार अवधुतवाडी यवतमाळ सेंटरच्या अनेक विद्यार्थ्यांनी युसीमॉस अबॅकस नॅशनल स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन करुन संस्थेचे नावलौकिक केले आहे. मेंटल अर्थमेटिक नॅशनल ऑनलाईन प्रतियोगिता दि. २८ व २९ जानेवारी संपन्न झाली. त्याचा निकाल दि. १२ फेब्रुवारी रोजी घोषित झाला. हि स्पर्धा १० मिनिटाची होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांना २०० प्रश्नांच उत्तरे द्यावयाची होती. या स्पर्धेत देशभरातून जवळपास ७ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये यवतमाळ युसीमॉस अबॅकस सेंटर यवतमाळच्या विद्यार्थी उमंग प्रमोद अग्रवाल ने द्वितीय तर विर मनोज अग्रवाल याने चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जिंकली तर इशित राहुल अग्रवाल, शिवांश दर्शन जाजू, अराध्य रविंद्र बोधे यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले व नॅशनल स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन करुन यवतमाळचे नावलौकिक केले. या स्पर्धेमध्ये दिव्यांश पोद्दार, रौनक गहरवार, दियांश झंवर, मयंक भरतीया, खुशी राठी, सकिना बॉम्बेवाला, जमिला बॉम्बेवाला यांनी सुद्धा सहभाग नोंदवून यवतमाळकरांचे नाव लौकिक केले. रचना कलंत्री द्वारा संचालित युसीमॉस अबॅकस सेंटर अवधुत विहार अवधुतवाडी यवतमाळ ने उज्वल यश संपादन केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Copyright ©