यवतमाळ सामाजिक

नेर, दारव्हा, दिग्रसच्या रुग्णांसाठी नेत्र शस्त्रक्रिया डॉ. तात्याराव लहाने उपस्थित राहणार

नेर, दारव्हा, दिग्रसच्या रुग्णांसाठी नेत्र शस्त्रक्रिया डॉ. तात्याराव लहाने उपस्थित राहणार

यवतमाळ – दिग्रस-दारव्हा-नेर या तालुक्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून नोव्हेंबरमध्ये ‘आरोग्य संकल्प शिबिर’ घेण्यात आले. या शिबिरात नेत्र तपासणी होऊनही शस्त्रक्रिया न झालेल्या रुग्णांसाठी यवतमाळ येथे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये गुरुवार, दि १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजतापासून नेत्र तपासणी शिबीर होणार आहे. यातून निवड झालेल्या रुग्णांवर त्यानंतर १७ फेब्रुवारीपासून पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्या उपस्थितीत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दारव्हा, दिग्रस, नेर तालुक्यातील गरजू रुग्णांनी मूळ आधारकार्डसह या नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आरोग्य सेवा समिती यवतमाळ तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

Copyright ©