यवतमाळ सामाजिक

वृक्षांना अलिंगन देऊन प्रेम दिवस साजरा करा

वृक्षांना अलिंगन देऊन प्रेम दिवस साजरा करा

प्रेम व्यक्त करण्यासाठी कोण्या एकच दिवसाची गरज नाही, पाश्चात्त्य संस्कृतीमुळे व व्यापारीकरणा मुळे विशिष्ट डे ची पाश्चात्त्य संस्कृती आपल्या देशात मोठ्या प्रमाणात पाश्चात्त्य संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी मारून व्हॅलेंटाईन डे रम्य ठिकाणी झाडाखाली बसून प्रेमाच्या शपथ घेऊन तरुण वर्गान कडून करण्यात येते, देशात, राज्यात कुठे या सात दिवस डे चे स्वागत होते तर कुठे कडकडून विरोध होते.

आपल्या देशात हिंदू संस्कृती नुसार सणवार, मातृ-पितृ पूजन, रक्षाबंधन, वृक्ष पूजन, गोवर्धन पूजन, वसुबारस, जगलं पूजन असे एक ना अनेक सन उत्सव साजरे केले जातात, मुलांनाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माँ जिजाऊ, सावित्रीबाई, शाहू, फुले यांचे विचार व आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करायला हवा हया हेतूने व मुलांनचा मना मध्ये वृक्षप्रेमाची एक चांगली भावना निर्माण होईल ह्या हेतूने पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जिल्हाध्यक्ष आणि संकल्प फाऊंडेशनचे सदस्य विनोद दोंदल यांनी मुलांच्या मनामध्ये वृक्षप्रेमाची व आपल्या संस्कृतीची एक चांगली भावना निर्माण होईल हया हेतूने १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपल्या काश्यपी दोंदल व वाहुल दोंदल मुलांना घेऊन वृक्षांना आलिंगन देऊन एक चांगला संदेश देण्यात आला.

खरे प्रेम करायचे असल्यास ते मग वृक्षांवर करा, आई-वडिलावर करा, पत्नी-मुलांवरील करा, दिनदुबळ्यावर करा, मित्र-मैत्रिणींवर करा, मुकप्राण्यावर करा किंवा आपल्या देशावर करा असा संदेश देऊन विनोद दोंदल यांच्या कडून नागरिकांनी व तरुणांनी वृक्षासोबत त्यांनी काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकण्याचे सोशल मीडियावर टाकण्याचे आवाहन केले आहे, या आगळ्या वेगळ्या कार्याची सर्वत्र दखल घेऊन कौतुक करण्यात येत आहे.

Copyright ©