यवतमाळ सामाजिक

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत जयहिंद मंडळाचे बादल राठोडणी पटकाविले गोल्ड मेडल

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत जयहिंद मंडळाचे बादल राठोडणी पटकाविले गोल्ड मेडल

 

दिनांक 11 ते 14 फेब्रुवारी या दरम्यान झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (नॅशनल लेव्हल) कबड्डी स्पर्धा उत्तर प्रदेश वाराणसी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या मध्ये कबड्डी व हॉलीबॉल मध्ये महाराष्ट्राचा संघ घोषित करण्यात आला होता त्यामध्ये महाराष्ट्राचे खेळाडू बादल राठोड यवतमाळ जिल्हा विठ्ठल जाधव जिल्हा जालना यामध्ये पहिला सामना उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही संघात खेळवण्यात आला यामध्ये महाराष्ट्र संघाचा दणदणीत विजय होऊन दुसरा सामना गाठला व दुसरा सामना हा हिमाचल प्रदेश यांच्यासोबत खेळवण्यात आला यामध्ये महाराष्ट्र संघाने दणदणीत विजय प्राप्त करून गोल्ड मेडल पटकविला या नंतर चा सामना दक्षिण कोरिया मध्ये खेळविल्या जाणार असल्याने यवतमाळ चे नाव बादल राठोड च्या रूपाने देशभरात चमकले असून बादल याचे सर्व स्तरमधून अभिंनदणाचा वर्षाव होत आहे.

Copyright ©