यवतमाळ सामाजिक

श्री. संत सेवालाल महाराज जयंती साजरी

प्रतिनिधी राम चव्हाण

श्री. संत सेवालाल महाराज जयंती साजरी

बोदेगावात रक्तदानाचा उत्सव

श्री. संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्यदैवत आहे. जगण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गात असणाऱ्या बंजारा समाजाला जगण्याचा मार्ग दाखविला. प्रगतीशील देशासोबत कसे चालता येईल हे हि सांगितले. एवढेच नाही तर त्यांनी त्या काळात सांगितलेल्या गोष्टी ह्या काळात सुद्धा लागू पडत आहेत.

त्यांचा हा वारसा पुढे घेऊन समाज बांधव आपली प्रगती साधताना दिसत आहे.

आज दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त बोदेगावात रक्तदानाचा उत्सव साजरा झाला. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून श्री. सेवालाल महाराजांना आदरांजली वाहिली.

समाजाला मानवतेची शिकवण मिळावी यासाठी काही मानवी मूल्याची संवर्धन करणे गरजेचे असते, त्यांच्या या शिकवणीतून आज रक्तदानाने श्री. संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमात रक्तदानांसाठी गावातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. समाजातील एकीचे बळ लक्षात घेता, तब्बल ६१ लोकांनी रक्तदान करून सामाजिक धर्म जोपासला. सौ. जयश्री यशवंत राठोड आणि श्री. यशवंत प्रयाग राठोड या दाम्पत्याने रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. यासाठी श्री. वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांचे चमूनी रक्तसंकलन केलं.

तर प्रमोद चव्हाण, धीरज राठोड, दत्ता चव्हाण, विनोद राठोड, अविनाश आडे, रुपेश चव्हाण, जगदीश राठोड, हर्षद राठोड, वैभव चव्हाण, रोशन राठोड, प्रमोद राठोड, जितेश चव्हाण, रक्त मित्र प्रफुल भोयर, पंकज राठोड, सुनील आडे तसेच श्री. संत सेवालाल महाराज मित्रमंडळ आणि गावातील तरुणांनी विशेष मेहनतीने कार्यक्रम यशस्वी ठरवला. यावेळी महिलांचा सहभाग स्मरणीय ठरला.

Copyright ©