यवतमाळ शैक्षणिक

प्रत्येकानी स्टीलचे ग्लास वापरण्या करीता बोधिसत्व खंडेराव फाउंडेशनच्या आंदोलनास सुरुवात

प्रत्येकानी स्टीलचे ग्लास वापरण्या करीता बोधिसत्व खंडेराव फाउंडेशनच्या आंदोलनास सुरुवात

 

यवतमाळ येथील पर्यावरणवादी बोधिसत्व खंडेराव याने प्लास्टिक कचरा टाळण्यासाठी, स्टेनलेस स्टील ग्लास वापरा असे आंदोलन सुरू केले आहे. अनेक शाळा या उपक्रमात सहभागी होत आहेत. कोवळ्या वयात विद्यार्थ्यांच्या मनावर केलेले संस्कार आयुष्यभर टिकतात. वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक स्वतः पुढाकार घेत अनेक शाळा सहभागी होत आहे होऊन त्यांना बोधिसत्वने सांगितलेली शपथ देत आहेत.

आज मासोळी पोड जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मनीषा केतकर यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्टील ग्लास वापरण्याची शपथ दिली असल्याने या आंदोलनास पाठिंबा मिळत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे,विद्यार्थी स्वयमस्फुर्तेने प्रतिसाद देत असल्याने या आंदोलनास सार्थकता प्राप्त होत आहे.. 22 एप्रिल ला जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने मासोळी पोड शाळेतील विद्यार्थ्यांना बोधिसत्व फाउंडेशन तर्फे स्टील ग्लासांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले

Copyright ©