यवतमाळ सामाजिक

स्वर बंजारा ने जिंकली समाजाची मने

स्वर बंजारा ने जिंकली समाजाची मने

दि.12 फेबुरवारी ला बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे अत्यंत उत्साहात व अथांग अशा जन सागरात सेवाध्वज सोहळा.संत सेवालाल महाराज यांचे अश्वरुढ पुतळ्याचे अनावरण व विविध विकास कामांचा भूमी पूजन सोहळा मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले.या सोहळ्यात चित्रपट निर्माता प्रा.सी.के.पवार निर्मित ,स्वर बंजारा , सास्कृतिक गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमात संपूर्ण भारतातील टॉप टेन एकूण दहा कलावंताची निवड करण्यात आली होती प्रा.सी.के.पवार मांगली बाई. बिक्सू नायक .गणेश कुमार.गजानन राठोड.नरेंद्र राठोड.स्नेहल चव्हाण.स्वाती पवार व सुनिल रामचंद्र चव्हाण रा. माळेगांव तह.आर्णी जी.यवतमाळ या कलावंतांनी एका पेक्षा एक सुंदर अशी गीते सादर करून समाजाची मने जिंकली या वेळी दहा लाखाच्या वर जन समुदाय उपस्थित होता

Copyright ©