यवतमाळ शैक्षणिक

समाजऋण फेडण्यासाठी व्‍यापक दृष्टि हवी : आ.मदन येरावार

समाजऋण फेडण्यासाठी व्‍यापक दृष्टि हवी : आ.मदन येरावार

उमरसरा येथे भरगच्च कार्यक्रमाने गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात

माणूस जन्माला येताच तीन प्रकारचे ऋण असतात. मातृऋण, पितृऋण आणि सामाजिक ऋण आहे. मातृ आणि पितृऋण आपल्याला कुटूंबातून पुर्ण करता येते. परंतु, सामाजिक ऋण फेडायचे असेल तर सामाजिक कार्यातून पुर्ण करावे लागते. त्यासाठी समाजातही आपला सहभाग महत्त्वाचा आहे. सामाजिक ऋण पुर्ण करायचे असेल तर व्‍यापक दृष्टी हवी, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन आमदार मदन येरावार यांनी केले.

ते उमरसरा येथे सोमवारी (ता. १३) गजानन महाराज प्रगटदिन कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. मदन येरावार, प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, बाळासाहेब शिवसेनेचे महिला आघाडीप्रमुख माधुरी अराठी, बाळासाहेब शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, दिनेश चिंडाले, बाळासाहेब शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश बेलोरकर, माजी सरपंच जयाताई गिरडकर व कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेनेचे राजूभाऊ बोडखे, मित्र परिवार मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थित होते.

राजुभाऊ बोडखे मित्र मंडळ व योगीराज बहुउद्देशीय संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश नगर विद्यानगरी उमरसरा येथे श्री संत गजानन महाराज प्रगटदिन उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता कलशस्थापना व पुजन, सकाळी ९ ते ४ आयुष्यमान भारत योजने अंतर्गत कार्ड कॅम्प, दुपारी ४ वाजता उत्साही महिला भजन मंडळ, व रात्री ८ वाजता श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ प्रेरणा नगर यवतमाळ यांच्या भजनांचा कार्यक्रम तर दिनांक १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता श्री नंदादिप महिला भजनी मंडळ व दुपारी २ वाजता संताजी महाराज महिला मंडळ जगत मंदिर तर रात्री ८ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार श्री हभप ऋषीश्वर गिरी महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम तर दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रीच्या पालखीचे आयोजन उमरसरा परिसरातील प्रमुख मार्गाने श्रीच्या पालखीची मिरवणूक तर सायंकाळी ५ वाजता श्रींची आरती, आदी कार्यक्रम घेण्यात आले . तर मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ६वाजता परिसरातील गरिब होतकरू शालेय विद्यार्थी व दिव्‍यांगांना सायकल वाटपाचा कार्यक्रम लोकप्रिय आमदार मदनभाऊ येरावार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तीन चाकी वाहन दिव्‍यांग बंधू विजय गज्जलवार, धर्मेंद कानारकर, रियांश शंभरकर यांना तर होतकरू विद्यार्थिनी युगा सहारे, राधिका तांगडे, वैष्णवी उगले, किरण मोरे, राधिका भूते, सानिका चौकडे, पुर्वा गुटके, उन्नती नरकुंडवार, स्वराली चौधरी, यशश्री वसंता मडावी आदींनी सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विजयकुमार बुंदेला, प्रास्ताविक वैष्णवी बोडखे तर आभार राजू गिरी यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजुभाऊ बोडखे, सविता बोडखे, किरण शिंगणवार, विनोद ढोणे, लोकेश मसराम, प्रयाग पराळे, प्रभाताई जोशी, अमित आडे, विवेक बोडखे, विवेक शुक्ला आदींनी पुढाकार घेतला.

Copyright ©