यवतमाळ शैक्षणिक

लाडखेड जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे वाटप

अन्सार खान प्रतिनिधी लाडखेड 9422192691

लाडखेड जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे वाटप

दारव्हा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा लाडखेड येथे प्रजासत्ताक दिनी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच तालुकास्तरीय खेळ व क्रीडा, सांस्कृतिक संवर्धन समिती च्या वतीने झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी शाळेमध्ये झालेल्या विविध संगीत खुर्ची स्पर्धा,चमचा लिंबू स्पर्धा,पोते बांधून धावण्याची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा मधील एकुण शाळेतील २२६ विद्यार्थ्यापैकी १७१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्या सर्वांना बक्षीस देण्यात आली. एवढ्या मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवुन बक्षीसे मिळाल्यामुळे गावकरी व पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक मा.श्री.विठ्ठलराव थेटे, सिंधुताई दुधे , किशोर उईके, सुनिता नासरे, घनश्याम बावणे,शिल्पा काळे, प्रणिता मोरे, अनुराधा कराळे, प्राजक्ता दुधे आदी शिक्षक तथा पालक व गावातील नागरिक उपस्थित होते.

Copyright ©