यवतमाळ सामाजिक

नामदार संजय राठोड धावले अपघात ग्रस्तांच्या मदतीला

नामदार संजय राठोड धावले अपघात ग्रस्तांच्या मदतीला!

यवतमाळ : नेर तालुक्यातील मांगला देवीच्या साधारण एक किलोमीटर अलीकडे ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला. जखमी झालेल्या रुग्णांना पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी स्वतःच्या वाहनातून दवाखान्यात पोहचविले.त्याच मार्गावरून नामदार राठोड हे त्यांच्या नियोजित कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाल्याचे त्यांना दिसले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी जखमीना तात्काळ नेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर तेथून पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या सर्व परिस्थितीवर पालकमंत्री नामदार राठोड स्वतः लक्ष ठेवून आहे. तसेच संबधित डॉक्टरांशी संपर्क करून अपघातग्रस्तांना मदत करण्याचे सांगितले आहे.

Copyright ©