यवतमाळ राजकीय

शिवसेनेचा चक्का जाम शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात आले

घाटंजी प्रतिनिधी अमोल नडपेलवार 

शिवसेनेचा चक्का जाम शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात आले

कापसाला प्रतिक्विंटल १०,००० रुपये हमीभाव जाहीर करा

घाटंजी येथिल खापरी नाका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शेकडो शिवसैनिक व शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणा देत प्रमुख मागण्या मांडल्या यामध्ये कापसाला प्रतिक्विंटल १०,००० रुपये हमीभाव जाहीर करा सोयाबीनला ७००० रुपये हमीभाव जाहीर करा तुरीची व चण्याची नाफेड मार्फत ऑनलाइन नोंदणी चालू करा या प्रमुख मागण्यासह चक्काजाम आंदोलन करण्यात आले ह्या आंदोलनामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या या आंदोलनामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख मनोज ढगले ,शहर प्रमुख प्रशांत मस्के ,शिवनी विभाग प्रमुख डॉक्टर अभिजीत निमकर ,पारवा सर्कल उपतालुकाप्रमुख मुकुंदा बूरकुंडे ,पारडी सर्कल उपतालुकाप्रमुख संतोष धेनावत, शिवनी सर्कल उपतालुकाप्रमुख भोपीदास राठोड, तालुका संघटक प्रदीप खोब्रागडे, युवासेना तालुकाप्रमुख अर्जुन चौधरी, शिवशक्ती भीमशक्तीचे तालुकाप्रमुख सचिन बनसोड महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख भावनाताई राऊत, महिला आघाडीच्या संगीताताई हस्ते ,उपविभाग प्रमुख संजय आडे, उपविभाग प्रमुख मंगेश गेडाम, दीपक परचाके पवन लांडगे उपशहर प्रमुख विशाल वातीले ,विभाग प्रमुख शैलेश चव्हाण, काशिनाथ जी वाघाडे शाखाप्रमुख विजय वडेश्वर दिलीप काकडे सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते..

अशी माहिती प्रशिल ढोके प्रसिद्धी प्रमुख आर्णी विधान सभा यांनी दिली.

Copyright ©