Breaking News यवतमाळ

स्वतंत्र काळा पासुन भोई समाजाला घरकुल योजनेचा लाभ नाही 

स्वतंत्र काळा पासुन भोई समाजाला घरकुल योजनेचा लाभ नाही 

सात वेळा लोकशाही दिनात तक्रारी केल्या मात्र दखल नाही

यवतमाळ जिल्ह्यातील चिखली या गावातील भोई समाज असून देशाला स्वतंत्र मिळालं तेव्हापासून घरकुल योजनेचा लाभ येथील भोई समाजाला मिळाला नाही घरकुल मिळाव या करीता भोई समाज शासन दप्तरी उबरठे झी आहे मात्र शासन अजूनही दखल घेत नाही घरकूल योजनेचा लाभ मिळावा या करिता सरपंचा पासून तर ग्रामविकास मंत्री यांचे पर्यंत पाठ पुरावे केले तरी कुणाला जाग आली नाही प्रथम सरपंच, गटविकास अधिकारी,तहसीलदार जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन सुद्धा दखल घेण्यात आली नाही सात वेळा लोकशाही दिनात तक्रारी देण्यात आल्या ग्रामविकास मंत्री हसनमुश्रीफ यांनाही याप्रकरणी निवेदन दिले होते,मात्र अजून पर्यंत कोणीही दखल घेतली नाही भोई समाज यांच्या नावे आलेले घरकुल दुसऱ्यांना वाटप करण्याचा प्रकारही अनेक वेळा घडला ग्रामविकास मंत्री कडून मिळणाऱ्या घरकुल यादीमध्ये लाभार्थ्यांचे नाव प्रकाशित झाले मात्र घरकुल देण्यात आले नाही याबाबत दत्ता दशरथ बावणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली ७ मार्च रोजी अर्ज दाखल केला त्यावर जिल्हाधिकारी यांनी आदेशही काढला मात्र पंचायत समिती दारव्हा येथील गटविकास अधिकारी यांनी तो आदेशही धुडकावला,यात दत्ता दशरथ बावणे गजानन बावणे राम केवदे रेणुका भानारकर नारायण बावणे सुनंदा केवदे नंदा पिरासे रामकृष्ण बावणे नर्मदा बावणे वनिता दिलीप केवदे यांना नियमानुसार घरकुल दिलेली नाही त्यामुळे घरकुल देण्याची मागणी अनेक निवेदनातून केली मात्र वरिष्ठ अधिकारी यांनी घरकुल देण्यास टाळाटाळ केली जिल्हाधिकारी यांनी नर्मदा दशरथ बावणे यांना घर देण्यात यावे याकरिता गटविकास अधिकारी यांना आदेश दिले परंतु त्या आदेशाला गटविकास अधिकारी यांनी केराची टोपली दाखवीत जिल्हाधिकारी यांनी सांगितले म्हणजे तुम्हाला घर मिळणार का असा उलट प्रश्न करीत यांना करून डावलण्याचा प्रकार सतत केला जात आहे हि बाब अत्यंत गंभीर असून या कडे जिल्हा अधिकारी यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.

Copyright ©