यवतमाळ सामाजिक

शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतिल विद्याथ्यांना प्रशिक्षण

शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतिल विद्याथ्यांना प्रशिक्षण.

वन जॉब ट्रेनिंग अंतर्गत प्रशिक्षण.

यवतमाळ : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय ) यवतमाळ येथील द्वितीय वर्षातिल विजतत्री (इले.) विद्यार्थ्यांना वन जॉब ट्रेनिंग अंतर्गत 150 तास इलेक्ट्रिशयन चे ट्रेनिंग तुमसरे इलेक्ट्रिकल वडगाव रॊड यांनी दिले.

या बाबत वूत्त असे की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतिल (आय. टी. आय ), इलेक्ट्रिशयन विजतंत्री द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांना वन जॉब ट्रेनिंग अंतर्गत एकूण तीस विदयार्थ्यांना दि. 04/02/2023 ते 25/02,2023 पर्यंत 150 तास प्रशिक्षण देऊन विद्याथ्यांना आपल्या पायावर उभे राहण्याची संधी यामुळे मिळणार आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य राहणारे तुमसरे इलेक्ट्रिकल चे व्यवस्थापक सागर तुमसरे हे या विद्यार्थी चे ट्रेनिंग योग्य प्रकारे व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री व्ही जे नागोरे सर , यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालू असून प्रशिक्षनार्थिना प्रशस्थिपत्र व सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्रसुध्दा देण्यात येणार आहे तुमसरे ईलेक्ट्रीकच्या पाठपुराव्यामुळे हे प्रशिक्षण देणे शक्य होत आहे अशी प्रतिक्रिया तुमसरे इलेक्ट्रिकचे सागर महादेवराव तुमसरे यांनी दिली यावेळी कमलेश मते, विशाल अतकरी,शांतुनु धोटे ईत्यादी उपस्थित होते.आणि प्रशिक्षणासाठी आलेले एकूण तीस विध्यार्थी यावेळी प्रशिक्षण घेत होते

Copyright ©