यवतमाळ राजकीय

अनिल हमदापुरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील कुपोषित बालकांना मोफत प्रोटीन पावडर ,पोषक आहार आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

अनिल हमदापुरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील कुपोषित बालकांना मोफत प्रोटीन पावडर ,पोषक आहार आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप….

 

सोबतच बालकांची तज्ञ डॉक्टर्स कडून आरोग्य तपासणी आणि रक्त चाचण्या आणि औषधांचे वाटप….

औचित्य वाढदिवसाचे… शिबिराला प्रचंड प्रतिसाद… जवळपास ४५० बालकांना मिळाला लाभ…

 

मनसेचे यवतमाळ जिल्ह्याचे नेते मा. अनिलभाऊ हमदापुरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कुपोषित बालकांना प्रोटीन पावडर, पोषक आहार आणि जीवनावश्यक वस्तूंचे आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन स्थानिक टिळक स्मारक येथे २८ जाने. रोजी करण्यात आले होते.कार्यक्रमाचे आयोजन अनिल भाऊ हमदापुरे मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद लाभला.

 

यवतमाळ जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर काहीतरी सकारात्मक उपाययोजना व्हावी या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न हा गंभीर स्वरूपाचा होत असून शासन कुठे तरी कमी पडत असल्याचा अनुभव या शिबिराच्या माध्यमातून आला. या शिबिराला सर्वप्रथम अंदाजे २०० बालक येतील असा अंदाज होता परंतु जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न किती गंभीर स्वरूप धारण करतोय याचा अंदाज शिबिराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातून आला. या शिबिरात जवळपास ४५०कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी झाली. सोबतच त्यांच्या रक्त चाचण्या पण मोफत करण्यात आल्या.

या शिबिराला यवतमाळ येथील बालरोग तज्ञ डॉ. स्वप्नील मानकर, डॉ. डवले सर, डॉ.अनिल आखरे,डॉ. सारंग तारक सर यांनी बालकांची तपासणी केली यावेळी सर्व बालकांना उत्तम दर्जाचे औषधी चे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमात आलेल्या बालकांना मोफत एका किट चे वाटप करण्यात आले त्यात प्रामुख्याने एक डबा प्रोटीन पावडर, ४ बॉटल मल्टिव्हिटॅमिन , शेंगदाणा लाडु भरणी, पेंड खजुर १किलो, राजगिरा लाडु२पाकीट सोबतच मुलांसाठी ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.या शिबिरात अतिदुर्गम भागातील बालकांचीही नोंदणी करण्यात आली जे प्रवाहापासून वंचित राहतात. येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात याप्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्याचा मानस या प्रसंगी अनिल हमदापुरे यांनी बोलून दाखवला.जिथे शासन कमी पडेल तिथे मनसे पोहचेल असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणचे या पूर्वीही विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आज पर्यंत जवळपास ५०० बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया, कॉकलीयर एम्प्लान्ट, बोन म्यारो,पायाची शस्त्रक्रिया,नेत्र शस्त्रक्रिया, कोरोना काळातील सामाजिक कार्य सह अनेक समाज उपयोगी उपक्रम अविरत पणे सुरू असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली, आणि या सर्व कार्यची प्रेरणा माझे आई-बाबा आणि माझी पत्नी डॉ. प्रिया हमदापुरे यांच्याकडून मिळत असल्याचे मत या प्रसंगी अनिल हमदापुरे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी विशेष करून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी त्यात प्रामुख्याने डॉ.रितेश बाळापुरे, डॉ.अश्विन कोल्हे, डॉ.संध्या धाडसे, डॉ. प्रसाद बनसोड डॉ.हर्षा साव, डॉ.जयश्री दिघडे,डॉ. जुबेर मणियार यासह या प्रकल्पाचे कार्यक्रम अधिकारी कुणाल पिसोळे आणि सर्व औषधी वाटपकर्ते आणि परिचारिका ,अंगणवाडी सेविका यांनी विशेष सहकार्य दिले. या शिबिराला प्रामुख्याने मनसेचे देवा शिवरामवार, विकास पवार,गजानन पोटे, साजिद अब्दुल, दिपक आडे, किशोर नरांजे, आक्रोश पवार यासह बालकांचे पालक इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©