यवतमाळ सामाजिक

चांदापूर येथील सोलर कंपनीने शेतातील सागवान झाडे पाडून,शेतीवरच केले अतिक्रमण 

चांदापूर येथील सोलर कंपनीने शेतातील सागवान झाडे पाडून,शेतीवरच केले अतिक्रमण 

सौरऊर्जा प्ल्यांटकरीता खोदकाम सुरू करण्यात आले ते त्वरित बंद करण्याची जिल्हा अधिकारी यांचे कडे केली मागणी

यवतमाळ तालुक्यातील चांदापुर येथील शेतकरी तुळशीराम राम शिंदे गट क्र.249 या शेतात श्री स्वामी समर्थ ग्रीन एनर्जी एल एल पी.या कंपनी कडून बळजबरीने ताबा केल्याची तक्रार केली तर अशोक पाटील यांनीही दोन लाखाच्या वरुन नुकसान केल्याची तक्रार केली आहे,यांच्याहि शेतातील सागवान झाडे, व आडजातिचे अनेक झाडे तोडून बळजबरीने शेतात ताबा करून काम सुरू केले या बाबत कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता जमिनीवर ताबा तर केलाच परंतु उभी झाडे हि तोडण्यात आली, परंतु वनविभाग या कडे दुर्लक्ष का करीत आहे असा सवाल शेतकऱ्यानं कडून करण्यात येत आहे, विशेष म्हणजे येथील काम जेसीबी द्वारे करण्यात येत असून शेतातील उभी असलेली सागवान झाडे पाडून सौर ऊर्जेचे काम बिनधास्त सुरू करण्यात आले असल्याने भविष्यात हे शेत निकामी होऊन उदरनिर्वाहाचा मार्ग बंद होणार असल्याचे शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत केले आहे,विशेष म्हणजे या कामास ग्रामपंचायत ची हि परवानगी घेण्यात आली असतानाही येथील काम सुरू करण्यात आले आहे, या बाबत शेतकऱ्यांनी त्यांना विचारणा केली असता काही गुंडांनी धमकावल्याचे हि शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली वण विभागास एक काडी जरी मिळाली तर त्या शेतकऱ्यास साहित्य सह अटक करण्यात येते मात्र इतके झाडे पाडूनही त्यांच्यावर कारवाई का आम्ही असा सवाल शेतकरी वर्गा कडून करण्यात येत आहे,हि बाब गंभीर असतानाही याची दखल घेतल्या जात नसल्याने आता वांमंत्र्याना निवेदन देण्यात येईल असे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले तर या प्रकरणी जिल्हा अधिकारी मुख्य उपवन सरक्षण अधिकारी,पोलीस अधिकारी वनअधिकारी यांना या प्रकरणी अशोक पाटील चांदापुर यांनी तक्रार दाखल केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

Copyright ©