यवतमाळ सामाजिक

कळंब चे पत्रकार शेषरावजी मोरे यांच्या वर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

कळंब चे पत्रकार शेषरावजी मोरे यांच्या वर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

घाटंजी:कळंब येथील पत्रकारावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ घाटंजी येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले

एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार

जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार तथा दैनिक देशोन्नतीचे कळंब तालुका प्रतिनिधी शेषरावजी मोरे यांच्यावर बातमी का प्रकाशित केली म्हणून कळंब येथील नगराध्यक्षाचा मुलगा सरोज सिद्दिकी याने व्यथित होऊन पत्रकार मोरे यांच्यावर गाडी चढवून मारण्याचा प्रयत्न केला व अश्लील भाषेत शिवीगाळ केली सोबतच जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली या घटनेच्या निषेधार्थ घाटंजी तालुक्यातील एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्थेने आज दि 1 फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांचे मार्फत निवेदन देऊन घटनेचा तीव्र प्रकारे निषेध व्यक्त केला.आहे

संबंधित प्रतिनिधींनी 30 जानेवारी रोजी कळंब येथे भरल्या जाणाऱ्या जत्रेच्या निमित्ताने वृत्त प्रकाशित केले होते या वृत्ताने व्यथित झालेले नगराध्यक्षाचे चिरंजीव यांनी जेष्ठ अशा पत्रकारास धमकी देऊन लोकशाहीच्या आधारस्तंभ असलेल्या प्रसार माध्यमाचा प्रतिनिधींवर जीवघेणा हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार हा अतिशय निंदनीय असून अशा मुजोर पदाधिकाऱ्यांना व त्यांच्या बगलबच्चांना धडा शिकवण्याच्या करिता कठोर कारवाई करण्यात यावी पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या वर शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी या निवेदनातून मागणी केली आहे

यावेळी एकता बहुउद्देशीय पत्रकार संस्थेचे अध्यक्ष कैलास कोरवते उपाध्यक्ष कज्जुम कुरेशी सचिव संतोष अक्कलवार मार्गदर्शक अनंत नखाते, गणेश भोयर, बंडूजी तोडसाम, अरविंद जाधव, सचिन कर्नेवार, मनोज राऊत, वसीम खान, एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य गण उपस्थित होते.

Copyright ©