Breaking News महाराष्ट्र राजकीय

राष्ट्राच्या अमृतवर्षात अर्थमंत्र्यांकडून अमृत वर्षा – सीए पियुष खेतान

प्रतिनिधी
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प हा देशाचे ५ ट्रिलियन डॉलर्सचे स्वप्न साकार करून भारताला आर्थिक शक्तीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प आहे. नवीन गुंतवणूकदार, नवे उद्योग, नवीन रोजगार यांना या अर्थसंकल्पातून प्रोत्साहन मिळणार आहे. गाव, गरीब, मध्यमवर्ग, महिला, शेतकरी यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे.
80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यासाठी अर्थसंकल्पात 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना फायदा होणार आहे. 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नात इन्कम टॅक्स सूट देऊन अर्थमंत्र्यांनी मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पात शिक्षण आणि आरोग्यावरही भर देण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक वाहने, एलईडी टीव्ही, कपडे स्वस्त होतील. सिगारेट, दारू महागणार.
भारताला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणारा हा अर्थसंकल्प आहे.

Copyright ©