यवतमाळ सामाजिक

कु.प्रियंका मेमोरियल फाउंडेशन कडून ॲड.प्रकाश आंबेडकर यांचा ट्रेजर ऑफ इंडियन पॉलिटिक्स ने सन्मान

कु.प्रियंका मेमोरियल फाउंडेशन कडून ॲड.प्रकाश आंबेडकर यांचा ट्रेजर ऑफ इंडियन पॉलिटिक्स ने सन्मान

दिग्रस येथिल कु प्रियंका मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने कोल्हेवडी ( पुणे) येथे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश अंबेडकर यांना ट्रेजर ऑफ इंडियन पॉलिटिक्स ने सन्मानित करण्यात आले. कु. प्रियंका आठवले मेमोरियल फाउंडेशन चे सचिव सदानंद आठवले यांच्या हस्ते हजारोच्या संख्येच्या उपस्थीतीत फाउंडेशनचे प्रमाण पत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे साचिव सदानंद आठवले यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.रोहन सदानंद आठवले, उपाध्यक्ष प्रणय भगत, प्रतीक वानखेडे, अर्णव भगत, अरुण जाधव यांनी अथक परिश्रम घेतले

Copyright ©