यवतमाळ सामाजिक

महावीर इंटरनॅशनल द्वारा चिकित्सा शिबिर संपन्न

 

यवतमाळ ः दि. २४ जानेवारी २०२३ रोजी टिंबर भवन येथे महावीर महावीर इंटरनॅशनल यवतमाळच्या वतीने जबलपूर येथील सुप्रसिद्ध डॉ. के. सी. तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारांच्या रोगांवरती उपचार करण्यात आले. त्यामध्ये लकवा, साईटिका, सर्वाइकल, स्पोंडलीलीस, स्पायनलडिस्क, मायग्रेन, डोके दुखी, गुटण्यांचे दुखणे, गाठ्यांची वात, ॲसिडीटी, पाचनक्रिया आदि विविध रोगांवरती जवळपास डॉ. के. सी. तिवारी यांनी उपचार केले. या शिबीरामध्ये जवळपास ११५ रुग्णांनी या चिकित्सा शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे यशस्वीतेसाठी महावीर इंटरनॅशनल संस्थापक अध्यक्ष प्रवीण निमोदिया, रवि निमोदिया, उमेश पोदार, प्रदीपसिंग ननरे, राजेश भूत, श्याम भंसाली, अरुण सिंघानिया, प्रेम राठी, गुरुदत्त उपाध्याय, माधुरी जैन, सौ. कामिनी वासुदेवराव अंबिलकर, कु. भक्ती रविंद्र धुमाले, संतोष चव्हाण सह महावीर इंटरनॅशनलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©