यवतमाळ शैक्षणिक

स्नेहसंमेलनात चिमुकल्या पाखरांचे कार्यक्रमांतर्गत चिमुकल्यांचा अद्भुत नृत्याविष्कार- ग्रामस्थांच्या डोळ्यांची फेडली पारणे .

———————————-
लहान मुलांचा नृत्याविष्कार बघून बालपण आठवताना मला सुद्धा माझे बालपण आठविले “सामाजिक -शैक्षणिक-आरोग्य क्षेत्रामध्ये जिथे कुठे अडचणी येतील. तिथे मी सदैव आपल्या पाठीशी उभा राहून. मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. – संतोष ढवळे ( रूग्णसेवक). ———————————–
या छोट्या शाळेतील विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच कारण, छोट्या मुलांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने शालेय जीवनातूनच प्रारंभ होतो त्याच वाटचालीच्या दिशेने विद्यार्थी घडून येतात..
मा रामकृष्ण भाकडे ( ठाणेदार लाडखेड पोलीस स्टेशन)
—————————————
बोरी अरब प्रतिनिधी- “म्हणतात ना कला आणि कलाविष्काराचे साधन एकच असलं तरी त्यातून कलेचे दर्शन घडविणारा प्रत्येक कलाकार हा वेगळाच असतो आज
बोरी अरब चंद्रशेखर येतील स्व माणिकराव सावंकार इंग्लिश मीडियम स्कूलच्या अवघ्या नर्सरी के जीवन केजी टू च्या इवले शाळा चिमुकल्या पाखरांचे पावलं स्टेज वरती थिरकताना जणू श्रोत्यांचा हृदयाचा ठाव घेत होती आणि सर्वांना मंत्रमुग्ध करीत सर्वांचे लक्ष वेधताना दुर्लभ चित्रण आज स्वर्गीय माणिकराव सावंकार इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलन चिमुकल्या पाखरांचे कार्यक्रम अंतर्गत घडून आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी
चिमुकल्यांच्या संदर्भात बोलताना यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णसेवक विद्यार्थ्यांना संबंधित करताना म्हणाले कि,
लहान मुलांचा नृत्याविष्कार बघून बालपण आठवताना मला सुद्धा माझे बालपण आठविले “सामाजिक -शैक्षणिक-आरोग्य क्षेत्रामध्ये जिथे कुठे अडचणी येतील. तिथे मी सदैव आपल्या पाठीशी उभा राहून. मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. असे विद्यार्थ्यांना संबंधित करताना म्हणाले ‌ आणि चिमुकल्यांशी हितगुज केली.
याच दरम्यान संपूर्ण छोटी छोटी मुले आपल्या इवलेच्या बुगडी बोलात मुख नाट्याचे सादरीकरण सुद्धा अप्रतिम करताना श्रोते मंत्रमुक्त झाले. यानंतर उद्घाटन प्रसंगी लाडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय श्री रामकृष्ण भाकडे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हणाले आज स्व माणिकराव सावंकार इंग्लिश मीडियम स्कूल मधील
या छोट्या शाळेतील विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच कारण, छोट्या मुलांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने शालेय जीवनातूनच प्रारंभ होतो त्याच वाटचालीच्या दिशेने विद्यार्थी घडून येतात.. असे उदगार काढून चिमुकल्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर प्रमुख अतिथी अशोकराव ठाकरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या .तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषणामध्ये माननीय नाना राऊत (अध्यक्ष बोरी कृषक सहकारी सोसायटी) यांनी सुद्धा शाळेचे आणि शिक्षकांचे कौतुक करताना पालकांचा सुद्धा सतत प्रत्येक कार्यक्रमात मोठा सहभाग असल्याचे दिसून येते विशेषता तथा गरीब विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट शैक्षणिक क्षेत्रात योगदान असणारे एकमेव संस्था असल्याचे शाळेविषयीचे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष.मा. नानाभाऊ राऊत (अध्यक्ष बोरी कृषक सहकारी सोसायटी) हे होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन
– मा. रामकृष्ण भाकडे (ठाणेदार (लाडखेड पोलीस स्टेशन) यांचे हस्ते झाले, यावेळी विशेष अतिथी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील शैक्षणिक आरोग्य सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे सर्वांचे लाडके माननीय संतोष ढवळे ( रूग्ण सेवक) हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून, माननीय
अशोकमामा जयस.वाल ( माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य) मा. अशोकराव ठाकरे ( माजी सरपंच) मा. रवी पाटील अवचट (सरपंच, हादगाव)मा. ज्ञानेश्वरी ताई कळंबे (ग्रामपंचायत सदस्या),मा. विनोद पाटील कावरे ( मा ग्रा. सदस्य),
सर्व सन्माननीय प्रमुखा तिथे
यामध्ये प्रफुल खडसे (ग्रामपंचायत सदस्य), गिरजानंद कळंबे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा रुग्णसेवक), रवी गजलवार ( शिवसेना तालुका उपप्रमुख यवतमाळ) ,योगेश ईलमे (शिवसेना शहर प्रमुख) निलेश पाटील बोरकर ,ऐहरार शेख( शिवसेना उपशहर प्रमुख), पुंडलिका भुरे (ठेकेदार), हरिभाऊ शेंद्रे ( सामाजिक कार्यकर्ता) , राजू पाटील ठाकरे,प्रकाश जी खंडारे, प्रदीप भाऊ दहापुते,प्रदीप मेश्राम,राजू बडे, आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक, आशिष सावंकार यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कु दर्शना जाबरस व फायका अंजुम यांनी केले. तर आभार धनश्री तिजारे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश जी गुप्ता, सुरेश जी तिजारे, अशोकराव राजगुरे, अनंत सावंत, निलेंद्र सिंगाडे, सागर जयस्वाल, शाळेच्या कर्मचारी सो सारीका तिजारे, तथा महिला पालक वर्गाने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले यावेळी प्रेक्षकांची अलोट गर्दी दिसून आली.

Copyright ©