राजकीय विदर्भ

पत्रकार शक्ती,वृत्त पञात बातमी प्रकाशित होताच ; सरपंच उपसरपंच यांची साक्षर्‍या घेण्यासाठी आटापीटा.

 

श्रीक्षेञ माहूर –

अनेक वृत्त पञात बातमी प्रकाशित झाल्यानंतर झोपेचे सोंग घेत असलेल्या वाई बाजार ग्रामपंचायतला जाग आली असून ग्रामसभा घेतली नसल्यामुळे अडचणीत येणार असल्याचे संकेत मिळाले असल्याने दि.२८ जाने.रोजी साक्षर्‍यांची मोहिम हाती घेवून झेंडा वंदनासाठी म्हणून या शिर्षकाखाली साक्षर्‍या घेण्यासाठी आटापिटा केला आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ नुसार २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना माहूर तालुक्यातील वाई बाजार ग्रामपंचायतने माञ प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा घेण्याचे टाळले,या मथळ्याखाली अनेक वृत्त पञाने दि.२८ जाने.रोजी बातमी प्रकाशित केल्या,या बातम्याची वरीष्ठ अधिकारी दखल घेवून कारवाई करतील या भिती पोटी नवनिर्वाचित सरपंच सिताराम मडावी व उपसरपंच उस्मान खान यांनी दि.२८ जाने.रोजी स.१० वाजताच्या सुमारापासून झेंडा वंदनासाठी म्हणून या शिर्षकाखाली बाजारपेटेतील ग्रामस्थांच्या साक्षर्‍या घेण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांनी आटापिटा केल्याची माहिती समोर आली आहे.या बाबत संबधित ग्रामविकास अधिकारी पी.जी देवकांबळे यांना भ्रमनध्वनीवरुण माहिती विचारली असता साक्षर्‍या बाबत मला माहिती नाही.मी नांदेडला कामा निमित्त आलो,असे सांगितले असून २६ जाने.रोजी आपण ग्रामसभा घेतली का ? असा प्रश्न आमच्या प्रतिनिधीने उपस्थित केल्यानंतर मला त्या बाबत काही ही माहित नाही.असे अत्यत बेजबाबदार उत्तरे देवून भ्रमनध्वनी बंद केला.या मागचे काय गौडबंगाल आहे. याची वरीष्ठ स्तरावरुण चौकशी होणे अत्यत गरजेचे असून यामध्ये व्यक्तिशः जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी,गटविकास अधिकारी व जि.प.चे उप.मुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग नांदेड यांनी लक्ष घालावे,अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे.

Copyright ©