यवतमाळ शैक्षणिक

मुस्लिम सेवा संघ यवतमाळ तर्फे शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य प्राप्त कु.ईश्वरी प्रमोद जाधव हिचा सत्कार

 
प्रतिनिधी
मुस्लिम सेवा संघ भारत यवतमाळ जिल्हा आर्णी तालुका उपाध्यक्ष जिब्राईल शेख यांच्या तर्फे प्रजासत्ताक दिनाचे अवचित्त्त साधून शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळविल्या बद्दल कू ईश्वरी प्रमोद जाधव या विद्यार्थिनीचा ट्रॉफी आणि मेडल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे प्रभारी अध्यक्ष ज्वालासिंग राठोड,ग्राम पंचायत सदस्य मुझफर शेख,नुर शेख,मुस्लिम सेवा संघ आर्णी तालुका कार्याध्यक्ष अनिस खान,शिक्षक मांडोले सर,शिक्षक,शेख सर तसेच गावकरी उपस्थित होते.गावाकडील विद्यार्थांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना आणण्यासाठी तसेच प्रोत्साहन मिळण्यासाठी मुस्लिम सेवा संघ भारत यवतमाळ जिल्हा असे सामाजिक कार्य नेहमीच करत असते ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन,हिम्मत मिळते आणि असे कार्यक्रम नेहमी मुस्लिम सेवा संघ जिल्हाध्यक्ष जावेद अली काझी याच्या नेतृत्वात होत असते असे प्रतिपादन मुस्लिम सेवा संघ यवतमाळ जिल्हा आर्णी तालुका उपाध्यक्ष जीब्राईल शेख यांनी केले.

Copyright ©