Breaking News यवतमाळ सामाजिक

*विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून संपवली जीवन यात्रा घातपात केळ्याचा काकांचा आरोप*

 

आशिफ शेख

सावळी सदोबा

पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजा सुभाष नगर येथील विवाहित महिला सौ जोस्ना
कीशोर राठोड वय 25 शुक्रवारपासून शेतात जातो म्हणून घरून निघून गेली एक दिवस व रात्र शोधा शोध केली असता कुठेही आढळून आली नाही अखेर शनिवारच्या सकाळी एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत सदर महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले सावली परिसरात महिला बेपत्ता असल्याची चर्चा सर्वांच्याच कानावर असल्यामुळे सर्वांनाच वाटले बेपत्ता असलेली महिला ही तीच आहे बघितलेल्या घटनेची सविस्तर माहिती पोलीस पाटला द्वारे पोलीस स्टेशन पारवा यांना कळविण्यात आली पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या समवेत सर्वच पोलिसांना तत्परतेने कामाला लागली विहिरीतील शेव बाहेर काढून सदर प्रेताचे शिवछेदन करण्यासाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले सदर मृतक महिलेचा पती किशोर राठोड घटना घडली तेव्हापासून घटनास्थळावर अथवा गावात कुठेही दीसुन आला नसल्याने स्वतःकडील मोबाईल बंद असल्याने अनेक बाबींचा रीतसर होऊ शकला नाही त्यांचे काय व्हायचे ते होईल परंतु कु ,शिवकन्या वय वर्ष ५ व कु सोमश्री वय वर्षे ३ या चिमुरड्या जीवांचा मायेचा ओलावा आटल्याने त्याच प्रेमाची उब देणारी आई त्यांना त्यांच्या थोड्यांना दिसेनासी झाली काय झाली काळजाला पाझर फोडणारी हृदयद्रावक घटना आयकताच प्रत्येकाच्या पापण्या आसवांनी डबडबल्या होत्या वृत्तलेपर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती मयताचे काका ज्ञानेश्वर जाधव साखर तांडा यांनी दिलेल्या तक्रारीवरून घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©