यवतमाळ सामाजिक

वसुंधरा फाउंडेशनने केले दिव्यांग बालकाच्या जीवनाचे सार्थक ; प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्तुस्य उपक्रम.

वसुंधरा फाउंडेशनने केले दिव्यांग बालकाच्या जीवनाचे सार्थक ; प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्तुस्य उपक्रम.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांचे हस्ते दिव्यांग बालकास व्हीलचेअर भेट.

यवतमाळ प्रतिनिधी -: कळंब तालुक्यातील एका दिव्यांग बालकाला दोन्ही पायाने चालता येत नसल्याने त्याला व्हीलचेअरची आवश्यकता असल्याची माहिती एनजीओ या ग्रुप वर कळली.या गरजवंत बालकाची संपूर्ण माहिती घेऊन त्याला चालण्यास मदत व्हावी या निस्वार्थ भावनेने वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा वर्षा पडवे यांनी याची दखल घेत तात्काळ व्हिल चेअर देण्याची कबुली त्यांनी दिली.तो दिव्यांग असल्यामुळे या वर्षी तो शिक्षणापासून वंचित राहिला, ही बाब वसुंधरा फाऊंडेशनच्या लक्षात आली.सार्थक प्रकाश गाडेकर वय ७ वर्ष रा.सोनेगाव ता. कळंब जि यवतमाळ याला व्हीलचेअर देण्यात आली. त्याची परिस्थिती फार बिकट आहे.हा मुलगा चालू शकत नसल्याने या गरीब मुलाला व्हिलचेअरची गरज होती.याची दखल घेत तात्काळ व्हील चेअर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून यवतमाळ येथे एका लग्नाची पुढची गोष्ट या नाट्य कार्यक्रमाला निमीत्त सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले आले असता यांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष वर्षा पडवे यांचे सह स्मिता ढेकळे,माधुरी कोटेवार,योगिता मासाळ,निर्मला आडे,सुचिता नागोसे,नेहा शर्मा,मनीषा वानखेडे,अर्पिता पोहनकर ,किशोर जाभुळकर , अश्विन सव्वालाखे,सागर मलकापूरे,प्रकाश गाडेकर पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©