यवतमाळ सामाजिक

धानोरा जि प शाळेत भारतीय सेनेमध्ये असलेले वृषभ कामडी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

संजय कारवटकर राळेगाव तालुका प्रतिनीधी

धानोरा जि प शाळेत भारतीय सेनेमध्ये असलेले वृषभ कामडी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथे प्रज्यासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज सोहळा मोठ्या दिमाखदार वातावरणात पार पडला.

शाळेत ध्वजारोहण हे शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष यांच्या हस्ते पार पडत असते परंतू शाळा व्यवस्थापन समिती धानोरा चे अध्यक्ष संजय कारवटकर यांनी ध्वजारोहण चा मान जि प शाळेचा माजी विद्यार्थी वृषभ किशोर कामडी हा भारतीय सेनेत आर्मी मध्ये कार्यरत आहे त्यामुळे त्यांच्या हाताने प्रज्यासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण करण्यात आले.

यापूर्वीही भारतीय सेनेत कार्यरत असलेले ईद्रजीत लभाने,अनिकेत उराडे ,व 10 वी मध्ये प्रथम आलेली कु.वैष्णवी प्रदिप गुजरकर या सर्व विध्यार्थीनी व सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.हे मात्र विषेश यावेळी धानोरा ग्रामपंच्यायतच्या सरपंच्या सौ.दिक्षाताई प्रविण मुन,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कारवटकर,उपाध्यक्ष सौ. मनिशा शंकर किनाके, शिवानी सातवकर ,सदस्य वाल्मीकराव मुडे, अविनाश साखरकर,उमेश हारगोडे,चद्रपाल लभाणे,दुर्गादास बोरकर, मनीशाताई कापटे,संगीताताई कुभलकर,सारीखाताई पोटभरे,व केंद्र प्रमुख विजय दुर्गे,मुख्याध्यापक विलास डोगरे,किरण देशमुख, रूपाली कडु,जोत्सना गायकवाड, केदार माॅडम व गावातील असख्य नागरीक उपस्थीत होते

Copyright ©