यवतमाळ राजकीय सामाजिक

आप कडून आरोग्य कर्मचाऱ्याचा सन्मान व रुग्णांना फळवाटप करून गणराज्य दिवस साजरा

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

आप कडून आरोग्य कर्मचाऱ्याचा सन्मान व रुग्णांना फळवाटप करून गणराज्य दिवस साजरा

घाटंजी:- घाटंजी जय स्तंभ पोलिस स्टेशन चौक येथे आम् आदमी पक्षाचा वतीने गणराज्य दिनाच्या निमित्त स्वतःचा घराचा विचार न करता केवळ देश सेवेसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या माझी सैनिकांचा सत्कार करण्यात आला व ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंभारे यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळ वाटप करून वैद्यकीय कर्मचाऱ्याचा सत्कार करून गणराज्य दिवस साजरा करण्यात आला. कोरोना काळात डॉक्टर व आरोग्य सेवा अधिकारी, कर्मचारी यांनी घाटंजी तालुक्यात दिलेल्या सेवेबद्दल पक्षाचा वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक संकटकाळात डॉक्टर्स, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे योगदान खूप मोठे आहे. रुग्णांची अहोरात्र मेहनत करून सेवा दिली. नागरिकांना धीर देणे, त्यांचे मनोबल उंचावणे, लसीकरणासाठी प्रबोधन करून प्रवृत्त करण्याचे काम त्यांनी केल्याचे मान्यवरांनी विचार व्यक्त केले. यावेळी आर्णी विधानसभा अध्यक्ष प्रेम चव्हाण, घाटंजी तालुका अध्यक्ष वैभव निखाडे, शहर अध्यक्ष अमोल नडपेलवार, युसुब पठाण, ओमप्रकाश डोहळे,अमित ढालवाले, सागर समंनवार, संजय प्रतापवार, सागर राठोड, दिपक घोलप, जॉनी राठोड, बंटी गवई, महेश लेदे, तथागत मानकर, अब्रापाल शंभरकर, निखिल खडसे, ईशांत खाडरे, दिपक देशमुख तसेच रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंभारे यांचासह संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिपक घोलप यांनी केले.

Copyright ©